जळगाव : कॉलनीमध्ये नवीन गॅस कनेक्शन देण्याच्या नावाने स्टॉल लावले. यानंतर महिलांना केवळ १५० रुपयात नवीन कनेक्शन द्यायचे आमिष दाखविले. उज्ज्वला गॅसचे कनेक्शन देण्याचे नाव करून महिलांची फसवणूक करण्यात आल्याचा (Jalgaon) प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात (Fraud) तब्बल २०० महिलांकडून पैसे घेऊन चौघे फरार झाले आहेत. (Maharashtra News)
जळगाव शहरातील हरिविठ्ठलनगर, खंडेराव नगर, आशाबाबानगर, अयोध्या नगर, गोपाळपुराया भागात संशयित कल्पेश ज्ञानेश्वर इंगळे, राहुल गणेश सपकाळे, विजय गंगाधर भोलाणे आणि किरण विजय भालाणे या चौघांनी उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत एलपीजी गॅस कनेक्शन देण्याच्या नावाने स्टॉल आणि बॅनर उपनगरांमध्ये लावले. यात कनेक्शन देण्याची बतावणी करीत महिलांकडून रेशनकार्ड, आधारकार्ड, कागदपत्रांची झेरॉक्स व फोटो घेऊन १५० रुपये जमा केले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जळगाव शहरातील वेगवेगळ्या परिसरात जाऊन महिलांचा विश्वास संपादन केल्या. यानंतर साधारण २०० महिलांकडून कागदपत्र व दीडशे रुपये घेऊन गेल्यानंतर अनेक दिवस उलटूनही कनेक्शन मिळत नसल्याने त्याबाबत महिलांनी संशयित यांना जाब विचारला. मात्र त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. दरम्यान आपली फसवणूक होत असल्याचे समजल्यानंतर महिलांनी शनिपेठ पोलिस ठाणे गाठत संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून याचा तपस सुरु करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.