Fraud: मोबाईलवर ॲप डाउनलोड करणे पडले महागात; ८५ हजाराची फसवणूक

मोबाईलवर ॲप डाउनलोड करणे पडले महागात; ८५ हजाराची फसवणूक
online fraud
online fraudsaam tv
Published On

जळगाव : मोबाईलमध्‍ये ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्याचे सांगत त्‍याच्या माध्यमातून ८४ हजार ८८९ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याबाबत फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon news Downloading an app on mobile is expensive 85 thousand fraud)

online fraud
कोविड रुग्णालयांनी थकविले वीजबिल; तब्‍बल सव्‍वाआठ कोटी थकीत

जळगाव (Jalgaon) शहरातील भवानी पेठमध्‍ये वास्‍तव्‍यास असलेल्‍या तेजस निवृत्ती कासार (वय २८) याने २८ जानेवारीला ईलेक्ट्रिक बिल भरण्यासाठी त्यांनी फोन-पे वरून त्यांच्या क्रेडीट कार्डवरून ऑनलाईन (Online Fraud) पाच हजार रूपये पेमेंट केले. परंतु क्रेडीट कार्डवर पैसे आले नाही; म्हणून २९ जानेवारीला सकाळी १० वाजता तेजसने क्रेडीट कार्ड कस्टमर केअरला फोन लावला. पैशांबाबत त्यांनी विचारणा केली.

पैशांसाठी ॲप्‍लीकेशन डाउनलोडचे सांगितले

थोड्यावेळाने तेजसला एका अनोळखी नंबरवरून कॉल (Cyber Crime) आला. तुमचे पैसे येण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरमधून एक आप्लीकेशन डाऊनलोड करायला सांगितले. अँपच्या माध्यमातून सर्व डिटेल्स दिले गेल्याने तेजस यांच्या क्रेडीट कार्डच्या खात्यातून एकुण ८४ हजार ८८९ रूपये ऑनलाईन वर्ग करून फसवणूक झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी तेजसने शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com