कोविड रुग्णालयांनी थकविले वीजबिल; तब्‍बल सव्‍वाआठ कोटी थकीत

कोविड रुग्णालयांनी थकविले वीजबिल; तब्‍बल सव्‍वाआठ कोटी थकीत
Mahavitaran
Mahavitaransaam tv
Published On

जळगाव : खानदेशातील विविध कोविड रुग्णालयांकडे ८ कोटी २६ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. महावितरणने वारंवार पाठपुरावा करूनही या रुग्णालयांनी थकबाकी भरलेली नाही. (jalgaon news Electricity bills exhausted by covid hospitals)

Mahavitaran
भरदिवसाचा थरार; युवतीला बंदुकीचा धाक दाखवत दरोडा

कोविडच्या (Covid) संकटातही महावितरणने नागरिकांसह सर्व रुग्णालये व अत्यावश्यक सेवांना अखंडित वीजपुरवठा केला. यात कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या शासकीय व खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. तेथे वीजपुरवठा खंडित होणार नाही याची महावितरणने (MSEDCL) पूर्णपणे काळजी घेतली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित न करता थकबाकी भरण्यासाठी संबंधित रुग्णालयांच्या प्रशासनाकडे महावितरण वारंवार पाठपुरावा करत आहे. मात्र रुग्णालयांनी बिलांची थकबाकी भरलेली नाही.

थकबाकीबाबत महावितरणचे पत्र

याबाबत महावितरणच्या जळगाव (Jalgaon) परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी नुकतेच या रुग्णालयांच्या अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहून वीजबिलाची पूर्ण थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे. थकबाकी भरण्यासंदर्भात वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही कोणताही योग्य प्रतिसाद मिळालेला नाही. मोठ्या प्रमाणात थकबाकी ठेवणे शक्य नसल्याने थकबाकी भरण्याची व्यवस्था करावी; अन्यथा नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

अशी आहे थकबाकी

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील (Jalgaon Medical Collage) दोन वीज जोडण्यांची १ कोटी ६६ लाख ४२ हजार ६४० रुपये थकबाकी आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे १० लाख ७५ हजार ८४८ रुपयांचे वीजबिल थकीत आहे. तर गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे तब्बल ४ कोटी ६६ लाख ३६ हजार २२३ रुपयांचे वीजबिल थकीत आहे. धुळे (Dhule) येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे ८३ लाख ८० हजार ८८७ रुपये तर शिरपूर येथील शासकीय रुग्णालयाकडे १२ लाख ६७ हजार ७६ रुपये वीजबिल थकले आहे. नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे ६१ लाख ४३ हजार ३२४ रुपये वीजबिल थकीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com