Fraud: ओटीपी विचारुन शिक्षकाला चुना; खात्यातून पन्नास हजार गंडवले

ओटीपी विचारुन शिक्षकाला चुना; खात्यातून पन्नास हजार गंडवले
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv
Published On

जळगाव : तुमच्या क्रेडीट कार्डची लिमिट वाढवून देतो; असे सांगत संपुर्ण माहिती विचारुन घेत शिक्षकाला ५० हजारात गंडविल्याची घटना शनिवारी घडली. जिल्हापेठ पोलिसात रविवारी फसवणुकीचा (Fraud) गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते. (jalgaon news cyber crime Teacher selected by asking OTP Fifty thousand wasted from the account)

Cyber Crime
‘व्हाइट वाटर रिव्हर राफ्टिंग' करणारी सहि‍ष्णा ठरली भारतातील सर्वात लहान

शहरातील सुकृती पिनॅकल अपार्टमेंटमधील रहिवासी तथा शिक्षक (Teacher) राजेंद्र नामदेव पाटील यांना शनिवार (५ मार्च) दुपारी २ वाजता आशिष या नावाने मोबाईलवर फोन आला. यावेळी त्याने राजेंद्र पाटील यांना तुमच्या क्रेडीट कार्डची लिमिट वाढवायची आहे. तरी तुमच्या क्रेडीट कार्डचा नंबर सांगून त्यांनी पाटील यांच्याकडून त्यांच्या कार्डबद्दलची संपुर्ण माहिती (Cyber Crime) काढून घेतली. त्यानंतर त्याने पाटील यांना तुम्हाला एक नंबर येईल तो मला द्या असे सांगत पाटील यांनी त्याला त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगितला.

ओटीपी सांगताच..

मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक राजेंद्र पाटील यांनी त्या सायबर गुन्हेगाराला सांगिताच त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया (Bank Of India) या बँकेच्या खात्यातून ४९ हजार ७५८ रुपये तर दुसर्‍या आरबीएल बँकेच्या खात्यातून ९ हजार एक रुपया कमी झाल्याचा मॅसेज त्यांना आला. दोघ बँकांच्या खात्यातून पैसे काढल्याचा मॅसेज येताच राजेंद्र पाटील यांनी क्रेडीट कार्डसाठी कॉल करणार्‍याचा परत फोन केला. परंतु त्याचे दोघेही मोबाईल क्रमांक बंद येत असल्याने आपली फसवणुक झाल्याची खात्री झाल्यावर राजेंद्र पाटील यांनी जिल्हापेठ पोलिस (Police) ठाणे गाठत तक्रार दिली. गुन्हा दाखल होवुन तपास मनोज पवार करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com