भांडे पॉलिश करताय तर सावधान; होवू शकतो असा प्रकार

भांडे पॉलिश करताय तर सावधाव; होवू शकतो असा प्रकार
crime
crime
Published On

जळगाव : शहरातील मेहरुण परिसरातील रेणुका हॉस्पीटल समोरील रहिवासी महिलेच्या घरी तांबे पितळाचे भांडे पॉलिशसाठी आलेल्या देान जणांनी चाळीस हजारांचे दागिने लांबवल्याची घटना घडली. (jalgaon-news-crime-news-forty-thousand-jewels-under-the-pretext-of-polish)

crime
Kolhapur Breaking : राधानगरी धरणाचा दरवाजा उघडलेल्या स्थितीत अडकला

जळगाव (Jalgaon) शहरातील मेहरुण परिसरात संगिता विजय सोनवणे (वय ४२) या कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. मंगळवारी (२८ डिसेंबर) दुपारी बाराच्या सुमारास तांबे-पितळाची भांडी पॉलिश करुन घ्या..असा आवाज आल्याने संगिता सोनवणे यांनी घरातील तांबे-पितळाची भांडे पॉलिशसाठी काढून दिले. भांड्यांवर पॉलिश करणाऱ्या भामट्यांनी हळुच आम्ही दागिने (Jewelry) देखील चांगले पॉलिश करुन देतो, असे म्हणत त्यांना दागिने पॉलिशचे आमीष दाखवत ३ ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, ४ ग्रॅम वजनाचे २८ मणी,३ ग्रॅमचे कानातील टॉप्स असा एकुण चाळीस हजारांचे दागिने पॉलिशसाठी घेतले.

हळदीत दागिने टाकल्‍याचे सांगून पळ

संगीता सोनवणे यांच्या डोळ्या देखत त्यांच्या जवळील रासायनिक द्रावणात ते टाकून नंतर हळद आणण्यास सांगून दहा मिनिटांनी दागिने काढून घ्या असे सांगत दोघांनी पळ काढला. दहा मिनिटांनी त्या भांड्यात दागिने नसल्याचे लक्षात आल्यावर आपली फसवणुक झाल्याची खात्री होवुन संगिता सोनवणे यांनी पेालिसांत (Police) धाव घेत दोघा भामट्यांची तक्रार दिली. एमआयडीसी पोलिसांत गुन्‍ह्याची नोंद करण्यात आली असून सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटिल तपास करत आहेत.

पॉलिश वाल्यांकडून सावधान

तांबे-पितळाची भांडी पॉलिशच्या बहाण्याने गल्लोगल्ली हिंडणारे भामटे एकट्या गृहीणींना हेरुन त्यांच्याकडे हात चलाखीने दागिने लंपास करतात. जळगाव शहरात घडलेल्या प्रकारानंतर चोरट्यांची टोळी शहरात व गाव-तालूक्यात सलग असे प्रकार करुन पसार होतील. तरी, कुठल्याही प्रलोभनाला गृहीणींनी बळी पडूनये तत्काळ पेालिसांना फोन करुन सुचीत करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com