Jalgaon News : नदीवर पूलच नाही, गावकऱ्यांचा पुरातून प्रवास; जळगावचं भीषण वास्तव, पाहा VIDEO

Dangerous journey no bridge on river Amalner : अमळनेरमध्ये नदीवर पूल नसल्यामुळे नागरिक पुराच्या पाण्यातून प्रवास करत आहे. या भीषण वास्तवाचा व्हिडिओ समोर आलाय.

मुंबई : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. अमळनेरमध्ये नदीवर पूल नसल्याने गावकऱ्यांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतोय. अमळनेरमधील हे भीषण वास्तव आता समोर आलंय. तामसवाडी धरण पूर्ण भरल्यानंतर मुळी नदीमध्ये विसर्ग करण्यात येतो. मात्र सातरी गावातील नदीपात्रावर पूल आणि रस्ता देखील नाहीये. त्यामुळे आजारी नागरिक, विद्यार्थी तसंच इतर कामांसाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील ही सद्यस्थिती आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, नदी पुर्णपणे भरलेली आहे. परंतु नदीपात्र ओलांडून जाण्यासाठी कोणताही पूल तिथे नाहीये. त्यामुळे नागरिक पाण्यातूनच प्रवास करत आहेत. पाण्याची पातळी खूप जास्त आहे. नागरिकांच्या अगदी गळ्यापर्यंत पाणी आलेलं दिसतंय. डोक्यावर सामान घेत गावकरी नदी पार करत आहे. सरकार आणि प्रशासन याकडे कधी लक्ष देणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com