पांडुरंगाच्‍या पादुकांचे भुसावळात आगमन; दर्शनासाठी गर्दी

पांडुरंगाच्‍या पादुकांचे भुसावळात आगमन; दर्शनासाठी गर्दी
Mundkheda
MundkhedaSaam tv
Published On

जळगाव : संत मुक्ताबाईच्या ७२५ व्या अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरवरून आलेल्या पांडुरंगाच्या पादुकांचे भुसावळ (Bhusawal) येथील विठ्ठल मंदिरात जोरदार स्वागत करण्यात आले आहे. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावली होती. (jalgaon news Arrival of Panduranga Padukas at Bhusawal)

Mundkheda
हेडफोन लावून चालणे पडले महागात; रात्रीच्‍यावेळी रेल्‍वे रूळ ओलांडताना घात

मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाईचा सातशे पंचविसावा अंतर्धान सोहळा उद्या आहे. या सोहळ्यासाठी पंढरपूर (Pandharpur) येथून निघालेल्या पांडुरंगाच्या पादुकांचे भुसावळ येथील विठ्ठल मंदिर वार्डातील विठ्ठल मंदिरामध्ये स्वागत करण्यात आले आहे. भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. सातशे पंचविसाव्या अंतर्धान सोहळ्यासाठी वर्षभरापासून 50 संस्थानांनी भजन किर्तन हरिनामाचा जयघोष अखंड कोथळी येथील मुक्ताई मंदिरामध्ये सुरू ठेवला आहे. या सोहळ्याची सांगता करण्यासाठी कौंडण्यपूर येथून रुक्मिणी संस्थान, त्र्यंबकेश्वर येथील संस्थान, सासवड येथील संस्थान, आळंदी येथील संस्थानचे मुख्य मुक्ताईनगर मंदिरात पोहोचलेले आहेत. या सर्वांचा व हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत उद्या मुक्ताईनगरमध्ये 725 वा मुक्ताबाईचा अंतर्धान सोहळा पार पडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com