हेडफोन लावून चालणे पडले महागात; रात्रीच्‍यावेळी रेल्‍वे रूळ ओलांडताना घात

हेडफोन लावून चालणे पडले महागात; रात्रीच्‍यावेळी रेल्‍वे रूळ ओलांडताना घात
Accident
AccidentSaam tv
Published On

जळगाव : कामावरून घरी परतत असताना कानात हेडफोन लावून रेल्वेरूळ ओलांडणाऱ्या तरुणीला रेल्वेची धडक लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मोटरमनकडून स्टेशन मास्टरला वायरलेस संदेश प्राप्त झाल्यावर त्यांनी तत्काळ लोहमार्ग पोलिसांना (Police) घटनास्थळी दाखल झाले. (jalgaon news girl died while crossing the railway line wearing headphones)

Accident
Sangali Crime : गुंड तुकाराम मोटेचा सांगलीत खून; चाकूने सपासप केले वार

जळगावातील (Jalgaon) शिवाजीनगरजवळ उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपूलाजवळच ही घटना घडली असून स्नेहल वैभव उज्जैनकर (वय १९, रा. धनाजी काळेनगर, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने शॉटकर्ट म्हणून परिसरातील रहिवासी रेल्वेरुळ ओलांडून ये-जा करतात. स्नेहल उज्जैनकर ही तरुणी आई– वडिलांसह शिवाजीनगर परिसरातील धनाजी काळेनगरात वास्तव्याला आहे. स्नेहल शहरातील एका कॉस्मेटिक दुकानावर कामाला होती. नेहमीप्रमाणे रात्री ८.३० वाजता काम संपल्यावर स्नेहल कामावरून घरी पायी जाण्यासाठी निघाली होती. स्नेहलही नेहमीप्रमाणे घराकडे जाण्यासाठी तहसिल कचेरीकडून जात असताना रेल्वे रुळावर आली. मात्र, उजव्या बाजूने (Bhusawal) भुसावळकडून येणाऱ्या सुरत-भुसावळ पॅसेंजरने तिला धडक दिली.

अंधार अन्‌ हेडफोनमुळे घात

उड्डाणपुलाचे काम सुरु असल्‍याने नागरीक रेल्वेरुळ ओलांडून ये-जा करत असतात. मात्र, कधी-कधी या रस्त्यावर अंधारही असतो. स्टेशनजवळ असल्याने रेल्वेगाड्यांची ये-जा सुरु असते. परिणामी हॉर्नही वाजतच असल्याने नागरिकांना याची सवय झाली आहे. स्नेहल देखील नेहमीची ये-जा करीत असल्याने (Railway) रेल्वेरुळ ओलांडताना बिनधास्त असावी त्यातच अचानक सुरत पॅसेंजर आल्याने तिला काही समजण्याच्या आत घात झाला. मयत तरुणीच्या कानात हेडफोन लावलेले आढळून आले. याप्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास लोहमार्ग पोलिस कर्मचारी सचिनकुमार भावसार आणि किशोर पाटील करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com