काम आटोपून घरी जाताना काळाची झडप; दुचाकीवरील दोन्ही ठार

काम आटोपून घरी जाताना काळाची झडप; दुचाकीवरील दोन्ही ठार
Accident
AccidentSaam tv
Published On

जळगाव : महामार्गावर भरधाव वेगाने जाणार्‍या अवजड वाहनाने दुचाकीला उडविले. यात दुचाकीवरील दोन्ही जण जागीच ठार झाल्याची घटना (Accident) घडली आहे. (jalgaon news accident news Both killed on the bike)

Accident
केंद्रीय मंत्री गडकरी येणार म्हणून रस्त्यांचे पालटले रुपडे

राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद नजीकच्या माऊली पेट्रोल (Jalgoan News) पंपाजवळ (एमएच ०६, बीई १७६९) या वाहनाने दुचाकीला (क्र. एमएच १९, एएक्स २४६०) जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्‍या अपघातात भूषण रमेश पाटील (वय ४२, रा. फैजपूर, ता. यावल) जागीच ठार झाले. तर गंभीर जखमी झालेले संजय मधुकर भिरूड (वय ४५, रा. मस्कावद, ता. रावेर) यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

काम आटोपून घरी जाताना अपघात

अपघातात मयत झालेले दोघे जण आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होते. जळगाव येथील काम आटोपून घरी जात असतांनाच त्यांच्यावर काळाने झडप घातली. मृत दोघांच्‍या परिवाराचा आक्रोश केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com