केंद्रीय मंत्री गडकरी येणार म्हणून रस्त्यांचे पालटले रुपडे

केंद्रीय मंत्री गडकरी येणार म्हणून रस्त्यांचे पालटले रुपडे
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

धुळे : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे २१ एप्रीलला धुळे दौऱ्यावर आहेत. मंत्री दौऱ्यावर असल्‍याने दुरावस्‍था झालेल्‍या रस्‍त्‍याचे मात्र रूपडे पालटले आहे. दोनच दिवसात रस्‍त्‍याचे डांबरीकरण करून चाचक करण्यात आला आहे. (dhule news Minister nitin Gadkari arrives corporation the roads work start)

Dhule News
चाऱ्याने भरलेल्या ट्रकला आग; मोठा अनर्थ टाळला

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन पार पडणार असून यादरम्यान मंत्री गडकरी यांचा धुळे (Dhule) शहरातील देवपूर परिसरामध्ये एका कार्यकर्त्याच्या घरीदेखील सदिच्छा भेट आहे. यामुळे देवपूर परिसरातील रस्त्याच्या कामाला पालिका प्रशासनातर्फे जय्यत तयारी केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यावर विरोधकांनी भाजपवर (BJP) चांगलाच निशाणा साधला आहे.

नेटकऱ्यांकडून भाजपची खिल्‍ली

"साधु संत येता घरी तोच दिवाळी दसरा, असं पूर्वीच्या काळी म्हणल जात होत परंतु आता मंत्री मंडळी येता घरी तेव्हाच विकासकामांच्या पायघड्या करी" असे म्हणून नेटकऱ्यांनी धुळे महानगरपालिकेवर सत्ता असलेल्या भाजपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

नागरीकांच्‍या विनंतीकडे होते दुर्लक्ष

गेल्या कित्येक वर्षांपासून धुळेकर रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जात होते. वारंवार नागरिकांतर्फे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांच्या संदर्भात पालिका प्रशासनाला विनंती केली जात होती. तसेच विविध संघटनांद्वारे याबाबत आंदोलन देखील करण्यात आली. परंतु पालिका प्रशासनातर्फे रस्त्यांची दुरावस्था सुधारण्यासाठी कोमतेही प्रकारचे उपाय योजना केली जात नव्हते. परंतु आता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे धुळ्यात आल्यानंतर देवपूर परिसरात एका कार्यकर्त्याच्या घरी सदिच्छा भेट देणार असल्यामुळे देवपूर परिसरातील रस्त्यांचे रूपडेच पालटले आहे. त्यामुळे आता नेटकर्यांनी सोशल मीडियावर विविध कमेंट करण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com