Jamner Accident : रिक्षाला अज्ञात वाहनाची धडक; चालकाचा मृत्यू, तिघेजण जखमी

Jalgaon News : जामनेर शहरात आई- वडील आणि दोन बहिणी यांच्यासह वास्तव्यास होता. रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.
Accident News
Accident NewsSaam tv

जामनेर (जळगाव) : रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. रात्रीच्या सुमारास रिक्षातून प्रवाशी घेऊन जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षा चालक तरुणाचा मृत्यू झाला. तर रिक्षात बसलेले तिघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात पहूर ते जामनेर रस्त्यावर घडला.

Accident News
Nashik Water Scarcity : दमदार पावसाअभावी नाशिक जिल्ह्यात अजूनही टँकरने पाणी पुरवठा; प्रशासनाकडून ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

जामनेरमधील (Jamner) रहिवाशी असलेला हेमंत समाधान माळी (वय २५) असे अपघातात मृत झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. जामनेर शहरात आई- वडील आणि दोन बहिणी यांच्यासह वास्तव्यास होता. रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान सोमवारी रात्री पहूर येथे गेला असताना तेथून ९ जुलैला मध्यरात्री दीड ते २ वाजेच्या सुमारास जामनेरला घरी परत येण्यासाठी निघाला होता. दरम्यान पहूर रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या रिक्षाला जोरात धडक दिली. या भीषण (Accident) अपघातात हेमंतचा जागीच मृत्यू झाला. 

Accident News
Nanded BJP : नांदेडमध्ये भाजपला पुन्हा धक्का; माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर यांचा राजीनामा

रिक्षातील तिघे किरकोळ जखमी झाले. यावेळी नागरिकांनी मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. हेमंत हा परिवारातील एकुलता एक व कर्ता पुरुष असल्याने त्याच्या जाण्यामुळे परिवाराला धक्का बसला आहे. हेमंतच्या मृत्यूची बातमी घरी समजताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान या घटनेप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याबाबत पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com