Cyber Crime: परदेशी विद्यापीठात नोकरीचे आमिष; प्राध्यापकाची ११ लाखांत फसवणूक

परदेशी विद्यापीठात नोकरीचे आमिष; प्राध्यापकाची ११ लाखांत फसवणूक
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv
Published On

जळगाव : जळगावातील प्राध्‍यापक असलेल्‍या कांतीलाल राणे या इसमास सिंगापूर येथील नॅशनल युनिर्व्हसिटीत नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडल्‍याने प्राध्यापकाला (Cyber Crime) सायबर गुन्हेगाराने १० लाख ८७ हजार ४८८ रुपयात फसविल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात (Cyber Police) गुन्हा दाखल झाला आहे. (Jalgaon Cyber Crime News)

Cyber Crime
अवैध धंद्यांना पाठबळ; डिवायएसपीची बदली तर पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे निलंबित

हैदराबाद येथील के. एल. विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरीस (Jalgaon) असलेले प्रा. कांतीलाल राणे यांना १४ सप्टेंबर २०२१ रोजी त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. आम्ही प्लेसमेंटचे काम करत असून जगातील विविध देशांमध्ये असलेल्या नामांकित विद्यापीठांमध्ये आम्ही नोकरी मिळवून देऊ शकतो. तुम्हाला अप्लाय करायचा आहे का? अशी विचारणा केली. प्रा. राणे यांना परदेशात नोकरी करायची इच्छा असल्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीस प्रतिसाद दिला. यानंतर राणे यांना वेळोवेळी अनेक मोबाईल क्रमांकावरून फोन येऊ लागले. यात शिल्पा आणि आर. एम. करणसिंग असे नाव सांगून त्यांच्याशी संवाद सुरू होता.

पैसे परत मागितल्‍यानंतर फोन बंद

सिंगापूर विद्यापीठात नोकरी मिळवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या बहाण्याने सायबर गुन्हेगाराने राणे यांच्याकडून २९ जुलै २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने १० लाख ८७ हजार ४८८ रुपये स्वीकारले. यानंतरही राणे यांच्याकडे पैशांची मागणी सुरूच होती. मात्र नोकरीबाबत काहीच हालचाल होत नव्हती. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच राणे यांनी दिलेले पैसे परत मागायला सुरुवात केली. यामुळे सायबर गुन्हेगारांनी संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याची खात्री पटल्यावर राणे यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पुरावे सादर केले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com