Jalgaon Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक पडली महागात; डॉक्टरची साडेसात लाखात फसवणूक

Jalgaon News : दोन सायबर गुन्हेगारांनी २८ डिसेंबर ते ३ फेब्रुवारी २०२४ काळात वेळोवेळी संपर्क साधला. यात त्यांना ‘ट्रेडिंग इन्व्हेसमेंट’च्या नावाखाली मोबदला देण्याचे सांगण्यात आले.
Jalgaon Cyber Crime
Jalgaon Cyber CrimeSaam tv
Published On

जळगाव : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकून आमिषाला अनेकजण बळी पडत असतात. मात्र शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत वाढीव मोबदला मिळवून देण्याचे आमिषाला डॉक्टरच अडकल्याचे (Jalgaon) जळगावात समोर आले आहे. वाढीव मोबदल्याच्या आमिषाने डॉक्टराची ७ लाख ४७ हजारात (Fraud) फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. (Maharashtra News)

Jalgaon Cyber Crime
Amravati News : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३५७ कोटींचा निधी; अमरावती जिल्ह्यात वाढीव निकषाने मिळणार मदत

जळगाव शहरातील सिंधी कॉलनीतील डॉ. उदासी हॉस्पिटलमधील डॉ. चंदरलाल प्रभुदास उदासी (वय ७०) यांच्याशी इक्षीत व समीर शर्मा नाव सांगणाऱ्या दोन (Cyber Crime) सायबर गुन्हेगारांनी २८ डिसेंबर ते ३ फेब्रुवारी २०२४ काळात वेळोवेळी संपर्क साधला. यात त्यांना ‘ट्रेडिंग इन्व्हेसमेंट’च्या नावाखाली मोबदला देण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार डॉ. चंदरलाल उदासी हे गुंतवणूक करत गेले. वेळोवेळी त्यांनी एकूण ७ लाख ४७ हजार रुपये गुंतवणूक केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalgaon Cyber Crime
Cotton Price : उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही हिंगोलीत नियमांची पायमल्ली; हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी

परंतु डॉ. उदासी यांना गुंतवणूक केल्याच्या मोबदल्यात कोणतीही रक्कम मिळाली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने डॉ. उदासी यांनी सोमवारी (ता.५) सायंकाळी ५ वाजता जळगाव येथील (Cyber Police) सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून गुन्हेगारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com