जळगाव : जळगाव शहरातील हार्डवेअर व्यावसायिकाला सोबत व्यापार करायचा आहे; असे सांगून कर्नाटकातील एकाने तब्बल पाच लाख ५६ हजार रुपयांत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधिताने एक लाख ३८ हजार रुपयांत सहा लाख ९५ हजार रुपयांचा माल घेऊन तो फरार झाला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
जळगाव शहरातील पोलन पेठेत मनोज विष्णू रडे यांचे प्रभात हार्डवेअर ॲन्ड इलेक्ट्रीकल जनरल नावाचे दुकान आहे. दरम्यान दोन वर्षांपूर्वी म्हणजे जानेवारी २०२३ मध्ये लक्ष्मण शिवाप्पा असंगी नामक व्यक्ती त्यांच्या दुकानात आल्यावर त्यांनी कर्नाटकातील बागलकोट येथे रामदास सिस्टीम इरिगेशन नावाचे त्यांचे शॉप असल्याचे सांगितले. शिवाय तुमच्यासोबत मला व्यापार करायचा असल्याचे त्याने मनोज राडे याना सांगितले.
६ लाख ९५ हजार रुपयांचा माल ऑर्डर
व्यापार करण्याचे सांगून त्यांनी सहा लाख ९५ हजार २५१ रुपयांच्या मालाची ऑर्डर दिली. त्यापोटी त्याने ४९ हजार ५०० रुपये रडे यांच्या खात्यावर पाठविले. त्यानंतर ४ फेब्रुवारी २०२३ ला ५० हजार रुपये आणखी पाठवून कर्नाटकाच्या व्यापाऱ्याने रडे यांचा विश्वास संपादन केला. नंतर रडे यांना उर्वरित रक्कम ही १५ दिवसांत पाठवेल, असे त्यांने सांगितले. १४ फेब्रुवारीला रडे यांनी संपूर्ण माल कर्नाटकात पाठविला.
उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ
असंगीकडे वारंवार पैशांचा तगादा लावल्यानंतर त्याने केवळ ३९ हजार रुपये पाठविले. नंतर पैसे पाठविण्यास त्याने टाळाटाळ केली. अखेर पाच लाख ५६ हजार रुपयांचा धनादेश पाठविला. पण, तोही वटला नाही. नंतर व्यापाऱ्याने फोन बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात लक्ष्मण असंगी याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.