Jalgaon Crime News: प्रियकराच्या मदतीने सासऱ्याची हत्या; हत्‍येमागचे कारण धक्‍कादायक

प्रियकराच्या मदतीने सासऱ्याची हत्या; हत्‍येमागचे कारण धक्‍कादायक
Jalgaon Crime News
Jalgaon Crime NewsSaam tv

जळगाव : किनगाव (ता. यावल) येथील साठवर्षीय वृद्धाचा गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (२४ मार्च) समोर आली होती. गुन्हा दाखल होऊन अठरा तासांतच स्थानिक गुन्हे शाखेने (Jalgaon News) गुन्ह्याचा उलगडा करून प्रमुख संशयित तरुणासह मृत वृद्धाच्या सुनेला अटक केली आहे. मृत सासरा सुनेकडे शरीरसुखाची मागणी करत (Crime News) असल्यावरून ही हत्या झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. (Tajya Batmya)

Jalgaon Crime News
Latur News: दुर्देवी..पिठाच्‍या गिरणीत ओढणी अडकली; महिलेचा जागीच मृत्यू

किनगाव येथील साठवर्षीय ट्रकचालक भीमराव शंकर सोनवणे यांचा मृतदेह शुक्रवारी पहाटे गळा चिरून खून केलेल्या अवस्थेत किनगाव-चुंचाळे रस्त्यावरील नाल्याचे पुलाखाली आढळून आला होता. मृत भीमराव सोनवणे यांचा मुलगा विनोद याच्या तक्रारीवरून (Yawal) यावल पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील यांच्यासह त्यांच्या तांत्रिक पथकाने ग्रामस्थांशी सलग संवाद, नातेवाइकांची माहिती, सोबतच घटनास्थळावर मिळून आलेल्या पुराव्यांचे अवलोकन करीत निरीक्षक किशन नजन पाटील यांनी मृताच्या सूनबाईला विश्‍वासात घेतले. सुनेच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीचे नाव घेताच तिने माहिती देण्यास सुरवात केली. सासरे भीमराव सोनवणे माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत असल्याने त्यांच्या हत्येचा कट रचल्याची कबुली तिने दिली.

Jalgaon Crime News
Jayant Patil: सत्ताधाऱ्यांना टीका सहन होत नसल्याचे चित्र; जयंत पाटील यांचा सरकारवर निशाणा

बहिणीचा मानलेला मुलगा खुनी

सुनेची मोठी बहीण उदळी (ता. रावेर) येथे राहत असून, तिचा मानलेला मुलगा जावेद शहा ऊर्फ जय अलीशहा (वय ३२, रा. प्रतिभानगर, वरणगाव. हल्ली मुक्काम उदळी, ता. रावेर) याच्या संपर्कात सून असल्याच्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने सुरवातीला वरणगाव नंतर उदळी (ता. रावेर) येथे संशयिताचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. पोलिसीखाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दोघा संशयितांना अटक करून यावल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com