Latur News: दुर्देवी..पिठाच्‍या गिरणीत ओढणी अडकली; महिलेचा जागीच मृत्यू

दुर्देवी..पिठाच्‍या गिरणीत ओढणी अडकली; महिलेचा जागीच मृत्यू
Latur News
Latur NewsSaam tv
Published On

लातूर : लातूर शहरातील होळकरनगर येथील रहिवासी असलेल्या एका पिठाच्या गिरणीचालक असलेल्या महिलेचा गिरणीच्या पट्ट्यात ओढणी अडकून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अश्विनी बालाजी ढोपरे असे महिलेचे मृत महिलेचे नाव आहे. (Latest Marathi News)

Latur News
Corona News: टेन्शन वाढलं! छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ दिवसात कोरोनाच्या 56 रुग्णांची नोंद; मास्क वापरण्याचे आवाहन

लातूर शहरात वास्‍तव्‍यास असलेल्‍या अश्विनी ढोपरे या एमआईटी मेडिकल कॉलेजमध्ये नर्स या पदावर काम करत होती. आपली ड्युटी सांभाळून त्‍या घरी घरगुती पिठाची गिरणी चालवत होत्या. हा त्‍यांचा रोजचा नित्‍यनियम होता. घराचे दळण दळण्यासोबतच त्‍या बाहेरचे देखील दळण काढण्याचे काम करत होते. परंतु, याच प्रकारात त्‍यांचा दुर्देवी मृत्‍यू झाला.

Latur News
Crime News : गर्लफ्रेंडचे लग्न दुसऱ्यासोबत ठरताच बॉयफ्रेंड संतापला; नवरदेवास पाठवला दोघांचा नको त्या अवस्थेमधला व्हिडिओ

ओढणी अडकताच ओढल्‍या गेल्‍या

धान्याचे दळण दळत असताना अचानक गिरणीच्या पट्यात त्‍यांची ओढणी अडकली. यात त्‍या ओढल्‍या गेल्‍या. पट्ट्यात ओढणी अडकल्‍याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये आकास्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com