Jayant Patil: सत्ताधाऱ्यांना टीका सहन होत नसल्याचे चित्र; जयंत पाटील यांचा सरकारवर निशाणा

सत्ताधाऱ्यांना टीका सहन होत नसल्याचे चित्र; जयंत पाटील यांचा सरकारवर निशाणा
Jayant Patil
Jayant PatilSaam tv

सागर निकवाडे

नंदूरबार : आठ ते दहा लाख लोकांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातून खासदार निवडून दिलेला असतो. मात्र तो खासदार सत्ताधारी पक्षाला (Nandurbar) नाकी नऊ आणत असेल आणि त्याची टीका जिव्हारी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याची टीका राष्‍ट्रवादीचे प्रदेशाध्‍यक्ष (Jayant Patil) जयंत पाटील यांनी केली. (Live Marathi News)

Jayant Patil
Corona News: टेन्शन वाढलं! छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ दिवसात कोरोनाच्या 56 रुग्णांची नोंद; मास्क वापरण्याचे आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षांतर्गत पक्ष संघटना बांधणीसाठी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा ते आढावा घेणार आहेत. नंदुरबार येथे आले असताना राहुल गांधींचे निलंबन ते अधिवेशनात शेतकऱ्यांना मदतीची न झालेली घोषणा अधिवेशनवर त्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगले टोले लगावले.

Jayant Patil
Latur News: दुर्देवी..पिठाच्‍या गिरणीत ओढणी अडकली; महिलेचा जागीच मृत्यू

सरकार आश्वासनाचा पलीकडे काही करत नाही

राज्यातील शिंदे– फडणवीस सरकार संवेदनहिन असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे बघण्यास त्यांना वेळ नसून अवकाळी पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र सरकारमधील मंत्री अधिवेशनाचे नाव करून अधिवेशनात मदत जाहीर केली जाईल; अशा घोषणा राज्यभर करत फिरले. मात्र अधिवेशन संपले परंतु सरकारने शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली नाही. पूर्ण अधिवेशन उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर टीका करण्यातच खची घातल्याचे चित्र आहे. सरकार फक्त आणि फक्त आश्वासनाचा पलीकडे काही करत नसल्याची टीका पाटील यांनी केले.

उद्धव ठाकरेंना मोठा पाठींबा

शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे मालेगावमध्ये सहभाग घेत असून या मतदारसंघात त्यांना लोकांचा मोठा पाठिंबा आहे. या सभेच्या माध्यमातून हा लोकांचा पाठिंबा नक्की व्यक्त होईल. लोकांना ओढून आणावं लागत नाही. ते स्वतःहून येतात हे त्यांच्या सभेचे वैशिष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com