Crime News : संशयाचं भूत डोक्यात शिरलं अन् ...; प्रियकराने प्रेयसीला संपवलं, जळगावातील धक्कादायक घटना

Jalgaon News : बापशीबाई या परिवारासह गावात वास्तव्यास होत्या. दरम्यान बापशीबाई या महिलेचे गावातीलच अनिल विरची पावरा याच्यासोबत प्रेमसंबंध होते
Chopda Crime News
Chopda Crime NewsSaam tv
Published On

अडावद (जळगाव) : प्रेयसीचे दुसऱ्या कोणासोबत प्रेम संबंध असल्याचा संशय प्रियकराला होता. यावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. यातूनच प्रियकराने महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना चोपडा तालुक्यातील गोरगावले खुर्द येथे घडली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

जळगावच्या चोपडा (Chopda) तालुक्यातील गोरगावले खुर्द येथील बापशीबाई मोहन पावरा (वय ४५) असे घटनेत मृत महिलेचे नाव आहे. बापशीबाई या परिवारासह गावात वास्तव्यास होत्या. दरम्यान बापशीबाई या महिलेचे गावातीलच अनिल विरची पावरा याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र आपल्या प्रेयसीचे दुसऱ्या कोणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय अनिल पावरा याला होता. यावरून दोघांमध्ये नेहमी (Crime News) वाद होत होते. 

Chopda Crime News
Buldhana crime News : धक्कादायक..खासगी शिकवणी वर्गात विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान संशयित पावरा व संबंधित महिला यांच्यात किरकोळ कारणावरून सारखी भांडणे होत होती. त्यातूनच २४ सप्टेंबरच्या रात्री संशयित पावराने महिलेचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले. याबाबत माहिती मिळताच अडावद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. तसेच घटनेचा पंचनामा केला. याबाबत अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित अनिल पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com