
जळगाव : जळगाव शहरातील चंदूअण्णा नगरमध्ये एका तरूणाने खासगी सावकारीतून पैशांसाठीचा तगादा आणि धमक्यांना कंटाळून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात कुणीही नसताना दोरीने गळफास घेऊन तरुणानं आयुष्य संपवलं. ही धक्कादायक घटना काल बुधवार २६ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी, अशी मागणी मयत तरुणाच्या नातेवाईकांनी तसेच त्याच्या बायकोने केलीय. त्यानंतर त्यांनी गंभीर आरोप देखील केले आहेत. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुकेश अर्जुन पाटील (वय ३५) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.
ते लोकं माझ्या नवऱ्याला पैशांसाठी एका वर्षापासून त्रास देत होते. लवेश चव्हाण आणि यश चौधरी या दोघांनीही माझ्या नवऱ्याच्या मागे पैशांसाठी तगादा लावला होता. लवेश चव्हाण हा त्यांना मारण्याची धमकी देत होता. त्यांनी प्रवृत्त केलं माझ्या नवऱ्याला आत्महत्या करण्यास, असा आरोप मुकेश पाटील यांच्या पत्नीने केलाय. ते चार ते पाच मुलं घेऊन आले होते. तू बाहेर ये, आम्ही तुला बघतोच, अशा धमक्या त्यांनी दिल्या. माझं देखील त्यांच्याशी बोलणं झालं. मी त्यांना सांगितलं की तुमचा एक एक रुपया मी परत करेन. तुझ्यामुळे माझ्या पतीने जर आत्महत्या केली तर बघचं.
आमच्या मुलाच्या दवाखान्यासाठी पैसे घेतलेले
माझ्या पतीने त्यांच्याकडून आमच्या मुलाच्या दवाखान्यासाठी पैसे घेतले होते. १ लाख २० आम्ही घेतलेले होते, त्यातून ६५ हजार परत केले गेले होते. पण तो २ लाख ९० हजार रुपये मागत होता. १ वर्षापासून तो आम्हाला धमक्या देत होता, तेव्हापासून आम्ही असंच जगत होतो.
काल माझं माझ्या नवऱ्याशी बोलणं सुरु होतं. त्यांनी मला सांगितलं की मी तुला भेटायला येतोय. मी माहेरी सुरतला गेलेली होती. त्यानंतर मी फोन केला पण त्यांचा फोन लागला नाही. तेवढ्यात आमच्या शेजाऱ्यांचा मला फोन आला, त्यांनी सांगितलं की, तुझ्या घरासमोर मुलं आली आहेत. ते धमक्या देत आहेत, तू बाहेर ये, तुला बघून घेऊ. त्यानंतर मी त्या मुलांशी बोलली. ते घराबाहेरुन धमक्या देत होते. मी त्यांना सांगितलं, तुमच्यामुळे माझ्या नवऱ्यानं जीवाचं काही बरं वाईट केलं तर बघा, पण तसंच झालं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.