Jalgaon Crime : माझे पती फोन घेत नाही, जरा बघता का? पत्नीचा शेजाऱ्यांना फोन, घरात डोकावलं तर...

Jalgaon Man Suicide : घटनेच्या दोन दिवस आधीच मुकेशने पत्नीला माहेरी पाठवलं होतं. त्यामुळे मुकेश हा घरी एकटाच होता. २६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता लवेश चव्हाण आणि त्याचे ४-५ साथीदार मुकेशच्या घरी आले.
Jalgaon Chandu Anna Nagar Man Ends Life
Jalgaon Chandu Anna Nagar Man Ends LifeSaam Tv News
Published On

जळगाव : जळगाव शहरातील चंदू अण्णा नगरात एका तरूणाने खासगी सावकारीतून पैशांसाठीचा तगादा आणि धमक्यांना कंटाळून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात कुणीही नसताना दोरीने गळफास घेऊन तरुणानं आयुष्य संपवलं. ही धक्कादायक घटना काल बुधवार २६ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी, अशी मागणी मयत तरुणाच्या नातेवाईकांनी केली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुकेश अर्जुन पाटील (वय ३५ वर्ष, रा. चंदूआण्णा नगर, जळगाव) असं मयत तरूणाचं असून तो पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होता. एम. जे. कॉलेज परिसरात तो आयएमपी कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवत होता. कोरोना काळात इन्स्टिट्यूट सुरु ठेवण्यासाठी मुकेशने मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलं होतं. ओळखीच्या लवेश चव्हाण याच्याकडून त्याने १ लाख २० हजार रुपयाचं कर्ज घेतलं होतं. त्यापैकी ६५ हजार रुपये त्याने परतही केले होते. मात्र, उर्वरित रक्कम व्याजासह २ लाख ९५ हजार रुपये होती. या रकमेच्या परतफेडीसाठी लवेश चव्हाण सतत तगादा लावत होता.

Jalgaon Chandu Anna Nagar Man Ends Life
UddhavThackeray: उद्धव ठाकरे आधुनिक काळातील औरंगजेब; शिंदे गटातील नेत्याची घणाघाती टीका

घटनेच्या दोन दिवस आधीच मुकेशने पत्नीला माहेरी पाठवलं होतं. त्यामुळे मुकेश हा घरी एकटाच होता. २६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता लवेश चव्हाण आणि त्याचे ४-५ साथीदार मुकेशच्या घरी आले. त्यांनी मुकेशला शिवीगाळ करत धमकावले आणि त्याची दुचाकी जबरदस्तीने हिसकावून नेली. या प्रकारामुळे मुकेश मानसिक तणावात गेला आणि त्याने दुपारी १२ वाजता आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पत्नीने वारंवार फोन केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने तिने शेजारी कळवले. शेजाऱ्यांनी खिडकीतून पाहिले असता, मुकेशने गळफास घेतल्याचं लक्षात आलं. तातडीने पोलिसांना आणि कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. त्यांनी मोठा आक्रोश करत, आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. 'जोपर्यत आरोपींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,' असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला.

Jalgaon Chandu Anna Nagar Man Ends Life
Ajit Pawar : छातीठोकपणे सांगतो, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; भर कार्यक्रमात अजित पवारांनी ठणकावलं, रोख कुणाकडं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com