Leopard Attack : दुर्दैवी बापाची करूण कहाणी! नरभक्षक बिबट्यानं डोळ्यांदेखत अवघ्या ४ वर्षीय मुलीला ओढत नेलं; भयंकर घटना

Jalgaon News : रांजणगाव शिवारात पुष्कर रवींद्र चव्हाण यांचे शेत असून लिंबाच्या बागेची राखण करण्यासाठी चार ते पाच महिन्यांपासून मध्य प्रदेशातील कांज्या पावरा हे पत्नी व तीन मुलींसह वास्तव्यास आहेत.
Leopard Attack
Leopard AttackSaam tv
Published On

चाळीसगाव (जळगाव) : लिंबाच्या बागेत वडील काम करत असताना त्यांच्या बाजूला खेळत असलेल्या चार वर्षीय बालिकेवर बिबट्याने झडप घालून ठार केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारात २ डिसेंबरला दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. गेल्या चार महिन्यांत बिबट्याचा हल्ला झाल्याची तिसरी घटना आहे.

चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारात पुष्कर रवींद्र चव्हाण यांचे शेत असून शेतात लिंबाच्या बागेची राखण करण्यासाठी चार ते पाच महिन्यांपासून मध्य प्रदेशातील कांज्या मांजऱ्या पावरा हे पत्नी व तीन मुलींसह वास्तव्यास आहेत. दरम्यान गुरुवारी दुपारी साडेचार ते पाचच्या दरम्यान कांज्या पावरा हे लिंबाच्या बागेत काम करीत होते. यावेळी बाजूलाच त्यांची मुलगी रसला (वय ४) खेळत होती. दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्या बालिकेवर झडप घालत तिला ओढत नेले. 

Leopard Attack
Bhusawal Crime : पोलीस असल्याचे सांगत गाडी अडविली; अडीच लाखाचे दागिने घेऊन पसार

जखमी चिमुकलीचा मृत्यू 

सदरचा प्रकार लक्षात येताच कांज्या पावरा याने आरडओरड केली. आवाज ऐकून आजूबाजूचे शेतकरी धावत आले. शेतकऱ्यांनी जोरजोरात आरडाओरड केल्यानंतर हल्ला करणारा बिबट्या तेथून पसार झाला. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रसला हिला तत्काळ चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले.

Leopard Attack
Tumsar Bajar Samiti : तुमसर बाजार समितीचा दोन दिवसांपासून व्यवहार ठप्प; बाजार समीतीच्या धोरणाचा शेतकऱ्यांकडून बहिष्कार

शिवारात बिबट्याच्या कायम वावर 
दरम्यान या भागात अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. कन्नड घाट गावापासून जवळच असल्यामुळे बिबट्यांचा नेहमीच वावर असतो. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासंदर्भात रांजणगाव ग्रामपंचायतीने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना पत्र दिले होते. मात्र, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याचे रांजणगावच्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बालिकेचा बळी गेल्याने ग्रामस्थांमध्ये अगोदर असलेली बिबट्याची भीती आणखी वाढली आहे. त्यामुळे शेतांमध्ये वावर असलेल्या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com