Tumsar Bajar Samiti : तुमसर बाजार समितीचा दोन दिवसांपासून व्यवहार ठप्प; बाजार समीतीच्या धोरणाचा शेतकऱ्यांकडून बहिष्कार

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील तुमसर- मोहाडी या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. मात्र मागील दोन दिवसांपासून सर्व व्यवहार थांबले शेतकरी, अडत्या, व्यापारी मोठ्या समस्यांना सामोरे
Tumsar Bajar Samiti
Tumsar Bajar SamitiSaam tv
Published On

शुभम देशमुख 

भंडारा : विदर्भातील गर्भश्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमसर- मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील चाळीस वर्षांपासून काम करणाऱ्या माथाडी कामगार, हमाल, मापारी, आणि टोपलेवाल्यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या मेहनतीचा न्याय मोबदला मिळत नसल्याच्या कारणास्तव कामकाज मागील दोन दिवसांपासून ठप्प झाले आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारे खरेदी विक्री याठिकाणी होत नाही. 

भंडारा जिल्ह्यातील तुमसर- मोहाडी या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. मात्र मागील दोन दिवसांपासून याठिकाणी होत असलेले सर्व व्यवहार थांबले आहेत. येथील हमाल कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार येथील हमालांना फक्त अडीच रुपये प्रति पोता मोबदला दिला जातो. यामुळे बाजार समितीतील सर्व हमालांची मागणी आहे की, सदर मोबदला योग्य पातळीवर नेण्यात यावा; हि प्रमुख मागणी आहे. 

Tumsar Bajar Samiti
Manmad Bajar Samiti : मनमाडमध्ये खाजगी जागेत कांदा लिलाव; बाजार समितीकडून व्यापाऱ्यांना नोटीस

नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप 

तसेच, वजन मर्यादेचे काटेकोर पालन आणि आरोग्य सुविधा पुरवल्या जाव्यात. हमालांनी उचलायच्या वजनाची ५० किलोची मर्यादा असूनही येथे या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. यामुळे बाजार समितीच्या धोरणामुळे मागील दोन दिवसांपासून बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचा माल खरेदी- विक्री ठप्प झाली आहे. शेतकरी विक्रीसाठी माल आणत असून तो परत न्यावा लागत आहे. 

Tumsar Bajar Samiti
Bhusawal Crime : पोलीस असल्याचे सांगत गाडी अडविली; अडीच लाखाचे दागिने घेऊन पसार

हमाल, शेतकऱ्यांकडून बहिष्कार

हमालांकडून करण्यात आलेल्या मागण्यांबाबत बाजार समितीकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. यामुळे हमालांकडून येथील माल उचलण्यास मनाई केल्याने येथील व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी शेतकरी, अडत्या, व्यापारी मोठ्या समस्यांना सामोरे जात आहेत. तर बाजार समितीच्या या धोरणाचा शेतकरी व हमालांकडून बहिष्कार करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com