Bhusawal Crime : पोलीस असल्याचे सांगत गाडी अडविली; अडीच लाखाचे दागिने घेऊन पसार

Jalgaon News : ५ डिसेंबरला वसंत पाटील व त्यांच्यासोबत एकजण असे दोघे दीपनगर बसस्थानक गाडीने जात होते. या दरम्यान दोन अनोळखी इसमांनी त्यांची दुचाकी अडविली यानंतर त्यांनी आपण पोलीस असल्याची बतावणी
Bhusawal Crime
Bhusawal CrimeSaam tv
Published On

जळगाव : वृद्धाला रस्त्यात अडवून पोलीस असल्याची बतावणी केली. या दरम्यान त्यांच्या ताब्यातील २ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन दोघेजण पसार झाल्याची घटना भुसावळ तालुक्यातील दिपनगर परिसरात घडली. या घटनेप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

भुसावळ शहरातील खळवाडी परिसरात वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त कर्मचारी वसंत जगन्नाथ पाटील यांची या घटनेत लुबाडणूक झाली आहे. दरम्यान ५ डिसेंबरला वसंत पाटील व त्यांच्यासोबत एकजण असे दोघे दीपनगर बसस्थानक परिसरात गाडीने सोबत जात होते. या दरम्यान दोन अनोळखी इसमांनी त्यांची दुचाकी अडविली. यानंतर त्यांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करत इतके सोने घालून का फिरतात? म्हणून विचारणा केली. 

Bhusawal Crime
Raigad Accident: डिझेल संपल्याने झाला घात, मुंबई-गोवा महामार्गावर कारला टोईंग व्हॅनची धडक; चौघांचा जागीच मृत्यू

तसेच पोलीस असून तुम्हाला मी सिटी मारली; तरी तुम्ही थांबले का नाहीत. या रस्त्याने एका म्हातारीला लुटलेले असून तुम्ही एवढे सोने घालून चालले आहेत, ते सोने काढा; असे वसंत पाटील यांना सांगू लागले. यानंतर वसंत पाटील यांच्याजवळ असलेले सोने व कागदपत्रे गाडीच्या डिक्कीत ठेवून देण्याचा बहाणा करत दोघांनी हातचलाखीने २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेत दोघांनी पलायन केले. याबाबत दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे करत आहेत.

Bhusawal Crime
Manmad Bajar Samiti : मनमाडमध्ये खाजगी जागेत कांदा लिलाव; बाजार समितीकडून व्यापाऱ्यांना नोटीस

पंढरपुरात पिस्तुलसह अवैध‌ हत्यारे जप्त
पंढरपूर शहरामध्ये बाहेरून येऊन जीवे ठार मारण्याचा कट करणाऱ्याना ताब्यात घेऊन गुन्हे प्रकटीकरण शाखेने एक पिस्टल तीन, जिवंत काडतूस, एक तलवार आणि एक चाकू जप्त केला आहे. कराड रोड लगतच्या श्रेयस पॅलेस च्या बाजूला असलेल्या मैदानामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com