चौथीतील धनश्री शाळेला निघाली, पण घरी परतलीच नाही; गावाबाहेर तिचं दप्तर सापडलं, अन्... नेमकं काय घडलं?

Mystery Deepens as Schoolgirl Disappears in Chalisgaon: जळगावच्या चाळीसगावात ९ वर्षीय चिमुकली बेपत्ता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये शेवटची दिसली. त्यानंतर थांगपत्त लागला नाही.
Mystery Deepens as Schoolgirl Disappears in Chalisgaon
Mystery Deepens as Schoolgirl Disappears in ChalisgaonSaam
Published On

जळगावच्या चाळीसगावातील तरवाडे बुद्रुक येथून धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. चौथीच्या वर्गात शिकणारी चिमुकली रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली आहे. सकाळी १० वाजता शाळेसाठी घरातून चिमुकली निघाली होती. मात्र, सायंकाळी चिमुकली परतलीच नाही. कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी चिमुकलीचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून, सध्या पोलिसांकडून शोधमोहिम सुरू आहे.

धनश्री उमेश शिंदे असं बेपत्ता झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. ही चिमुकली तरवाडे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकत आहे. शुक्रवारी १२ डिसेंबर रोजी चिमुकली सकाळी शाळेसाठी घरातून निघाली. मात्र, संध्याकाळी झाली तरी ती घरी परतली नाही. आई-वडील शेतातून घरी परतले. त्यानंतर चिमुकली घरी न दिसल्याने त्यांनी शाळेत चौकशी केली.

Mystery Deepens as Schoolgirl Disappears in Chalisgaon
मुंबईसह ५ महापालिकेत ठाकरे बंधूंची युती, २ दिवसात घोषणा, उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने सगळं सांगितलं, वाचा सविस्तर

शाळेत चौकशी केली असता, सायंकाळी पाच वाजेपर्यंत ती शाळेत होती, नंतर घरी निघाल्याचे शिक्षकांनी सांगितले. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी सर्वत्र शोध घेतला. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायंकाळी सुमारे ४.५५ वाजता ती न्हावे रस्त्याने ग्रामपंचायत कार्यालयाजवळून जाताना दिसून आली.

Mystery Deepens as Schoolgirl Disappears in Chalisgaon
मैत्रिणींसोबत पिकनिकला गेली, हायवेवर पोलीस महिलेने बेधुंद डान्स केला, VIDEO मुळे उडाली खळबळ

मात्र त्यानंतर तिचा काहीही पत्ता लागलेला नाही. दरम्यान, गावाबाहेरील शेत रस्त्यावर धनश्रीचे दप्तर आढळून आले. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, जळगाव एलसीबीसह वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी गावात ठाण मांडून असून, आजूबाजूचा परिसर आणि शेतशिवार पिंजून काढत शोधमोहीम सुरू आहे. मात्र ५० तास उलटूनही चिमुकलीचा थांगपत्ता न लागल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com