जळगाव : भडगाव तालुक्यातील एका गावातील ७ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृतदेह मिळाल्याप्रकरणी तपासात (Jalgaon) एलसीबीला यश मिळाले आहे. या प्रकरणी मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार गावातच राहणाऱ्या तरुणाने केल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान या नराधमाला बेड्या ठोकण्यात आल्या असून पुढील तपासासाठी (Bhadgaon) भडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Maharashtra News)
भडगाव तालुक्यातील एका गावातील ७ वर्षीय मुलगी रविवार (३० जुलै) सायंकाळी घरी मिळून न आल्याने पालकांनी मुलीच्या अपहरणाची तक्रार पोलीस स्टेशनला केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी १ ऑगस्टला मुलीचा कुजलेला मृतदेह त्यांच्या घराजवळील शेतकऱ्यांच्या कडबा कुट्टीत मिळून आला होता. गावातील महिला व नातेवाईकांनी भडगाव पोलीस स्टेशन गाठून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाल्याशिवाय (Crime News) आम्ही अंत्यविधी करणार नसल्याचा पवित्रा घेतला होता.
कुट्टीतून वास आल्याने प्रकरण उघड
दरम्यान, गावातीलच एका तरुणावर पोलिसांना (Police) संशय आला. ज्या कडब्याच्या कुट्टीत मृतदेह मिळाला ती कुट्टी गोठ्यात होती. त्याच्यावर संशय बळावल्याने त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. ३० जुलैला दुपारी सदर मुलीला आमिष दाखवून त्याच्या गोठ्यात बोलाविले. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर प्रकरण उघड होऊ नये; म्हणून तिच्या चेहऱ्यावर दगड मारून तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह त्याने गोठ्यातील कडब्याच्या कुट्टीखाली लपवून ठेवला होता. दरम्यान दोन दिवसांनी ग्रामस्थांना उग्र वास आल्याने प्रकरण उघड झाले.
मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबाशी संवाद
घटनेनंतर जळगाव जिल्ह्यातील तरुणींसह महिला रस्त्यावर उतरल्या. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पीडित कुटुंबीयांना कुटुंबीयांशी फोनवर संवाद साधला. त्यानंतर मोर्चेकरांनी आरोपी नराधमाला फाशी देण्याची पीडित मुलींच्या आई वडिलांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. यावेळी नराधम आरोपीवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांना दिले.
पोलिसांवर दगड फेक
जळगाव जिल्ह्यातील अपहरण झालेल्या बालिकेचा मृतदेह आढळून आल्यानंतर संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. या आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी संतप्त जमावाने दगडफेक केली. यात तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. एलसीबीने संशयित आरोपीला अटक केली असून त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला भडगाव पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पो. अधीक्षक रमेश चोपडे आदींच्या पथकाने तपासात यशस्वी कामगिरी केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.