Jalgaon News: अमळनेर दंगलीतील संशयिताचा कारागृहात मृत्यू

अमळनेर दंगलीतील संशयिताचा कारागृहात मृत्यू
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : अमळनेर येथे घडलेल्या दोन गटांतील दंगलीतील संशयिताचा जळगाव (Jalgaon) कारागृहात बुधवारी (ता.१४) दुपारी मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर (Amalner) अमळनेरमध्ये पुन्हा दंगलीची अफवा पसरविण्यात आली, मात्र तसा कोणताही प्रकार नसून शांतता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. (Latest Marathi News)

Jalgaon News
Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांचे आंदोलन तूर्तास स्थगित; बहुतांश मागण्या मान्य

अमळनेर येथे गेल्या आठवड्यात अल्पवयीन मुलांच्या वादातून दोन गटांत भीषण दंगल उसळली होती. त्यात पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अनेक नागरिकही जखमी झाले. दोन्ही गटाकडील शेकडो जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. काही जणांना अटकही करण्यात आली. यात संशयित अश्‍पाक सलीम (उर्फ पक्या) यालाही अटक करण्यात आली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत जळगाव कारागृहात होता. बुधवारी (ता.१४) दुपारी अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

Jalgaon News
Wardha Bogus Seeds Factory: वर्ध्यातील बोगस बियाणे विक्रीचं गुजरात कनेक्शन; पशुवैद्यकीय डॉक्टरसह १० जणांना अटक

‘सिव्हिल’मध्ये तणाव

कारागृहात मृत्यू झाल्याची बातमी कळताच समाजबांधवांनी सामान्य रुग्णालय परिसरात गर्दी केली, त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. या घटनेमुळे अमळनेरला पुन्हा वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयात (Jalgaon Civil Hospital) करीम सालार, फारूक शेख, एजाज मलिक यांच्यासह कुटुंबीयांचे नातेवाईक, मित्रपरिवार दाखल झाले. अश्‍पाक सलीम याचा मृत्यू कोठडीत झाल्याने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, तसेच इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे.

Jalgaon News
Amravati Water Cut News: अमरावती, बडनेरा शहराचा आज पाणीपुरवठा बंद राहणार; जाणून घ्या कारण

अमळनेरला तणावपूर्ण शांतता

दंगलीतील संशयित अशपाक उर्फ पक्या सलीम शेख याचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच शहरातील दुकाने सायंकाळी पटापट बंद झाल्याने नागरिकांची पळापळ सुरू झाली. वेगाने मोटारसायकली, रिक्षा घराकडे जाऊ लागल्या होत्या. त्यामुळे दगडफेक झाल्याची अफवा पसरली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com