Wardha Bogus Seeds Factory: वर्ध्यातील बोगस बियाणे विक्रीचं गुजरात कनेक्शन; पशुवैद्यकीय डॉक्टरसह १० जणांना अटक

Wardha Bogus Seeds: या प्रकरणातील मुख्य आरोपी राजू जयस्वाल हा गुजरात येथील अहमदाबाद जिल्ह्यातील ईडर येथील राजूभाई आणि महेंद्रभाई यांच्याकडुन बोगस बियाणे मागवायचा.
Wardha Mhasala Bogus Seeds Factory
Wardha Mhasala Bogus Seeds FactorySaam TV
Published On

चेतन व्यास, साम टीव्ही

Wardha Mhasala Bogus Seeds Factory: वर्ध्यातील म्हसाळा परिसरातील एका स्लॅबच्या इमारतीत सुरु असलेला बोगस बियाणे विक्री कारखाना उद्धवस्त करीत बनावट बियाणे विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणात सेवाग्राम पोलिसांनी १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन ८ आरोपींना अटक केली होती. (Latest Marathi News)

याच प्रकरणात पुन्हा दोघांना अटक करण्यात आल्याने अटक आरोपीची संख्या दहावर पोहचली आहे. कोमल कांबळे (रा. सोनेगाव बेला, जि. नागपूर) याला अटक करुन त्याच्या कृषी सेवा केंद्रातून बोगस कपाशी बियाण्यांची ७४ पाकिटं पोलिसांनी जप्त केली आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातून मेहमूद गफ्फार चौहान याला अटक करण्यात आली आहे.

Wardha Mhasala Bogus Seeds Factory
Monsoon Rain Update: बिपरजॉय चक्रावादळाने टेन्शन वाढवलं; मान्सूनच्या सरी कधी बरसणार? हवामान खात्याकडून नवी अपडेट

पशुवैद्यकीय डॉक्टर करायचा शेतकऱ्यांची फसवणूक

या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने वर्धा (Wardha News) जिल्ह्याच्या हमदापुर येथून एका पशुवैद्यकीय डॉक्टरला अटक केली. विजय अरुण बोरकर असं आरोपी डॉक्टरच नाव आहे. हा जनावरांचा डॉक्टर असून गावागावांत जनावरांवर उपचार करण्यासाठी जाताना बोगस बियाण्यांची पाकिटं घेऊन जातं त्याची शेतकऱ्यांना विक्री करीत होता.

पोलिसांनी अटक करताच या डॉक्टरने बियाणे विक्री (Bogus Seeds) केल्याची कबुली दिली आहे. प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दहा आरोपीना अटक करत न्यायालयात हजर केले असता, न्यायलयाने आरोपीना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Wardha Mhasala Bogus Seeds Factory
Gunratna Sadavarte on Sharad Pawar: शरद पवार हे वैचारिक व्हायरस; गुणरत्न सदावर्तेंची शरद पवारांवर टीका

बोगस बियाणे विक्रीचं गुजरात कनेक्शन

या प्रकरणातील मुख्य आरोपी राजू जयस्वाल हा गुजरात (Gujarat) येथील अहमदाबाद जिल्ह्यातील ईडर येथील राजूभाई आणि महेंद्रभाई यांच्याकडुन बोगस बियाणे मागवायचा. याने आतापर्यंत 29 टन बियाणे मागविले आहे. यापैकी 14 टन बियाणे त्याने विक्री केल्याची माहिती आहे तर 15 टन बियाणे पोलिसांनी पकडले.

आरोपी राजू जयस्वाल याने गुजरातच्या आरोपींना आतापर्यंत १७ लाख रुपये दिले असून उर्वरित मालाचे पैसे बाकी असल्याची माहिती आहे. या प्रकरणात पोलीस अधीक्षक नुरूल हसन हे स्वतः स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड आणि सेवाग्रामचे प्रभारी ठाणेदार धनाजी जळक यांना मार्गदर्शन करत आहे. पोलीस अधीक्षकांनी लवकरच या संपूर्ण रॅकेटच्या आरोपीना ताब्यात घेणार असल्याची माहिती दिली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com