Jalgaon Accident
Jalgaon AccidentSaam tv

Jalgaon Accident News : कामावरून घरी जाताना मृत्यूने गाठले; सुसाट ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Jalgaon News : रात्री काम आटोपून ते घरी जाण्यासाठी निघाले होते. नेहमीच्या मार्गाने जात असताना रात्री अजिंठा चौकात आले असताना सुसाट ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात शेळके यांचा मृत्यू झाला
Published on

जळगाव : जळगाव शहरातील अजिंठा चौकात सुसाट जाणाऱ्या ट्रक चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदरचा अपघात बुधवारी (१८ डिसेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. अपघातानंतर अजिंठा चौकात गोंधळ उडाला होता. 

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीमधील रहिवाशी विठ्ठल पांडुरंग शेळके (वय ५५) असे अपघातात मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. विठ्ठल शेळके हे शहरातील बळिराम पेठेतील बॉम्बे वडापाव सेंटर येथे कामाला होते. रात्री काम आटोपून ते घरी जाण्यासाठी निघाले होते. नेहमीच्या मार्गाने जात असताना रात्री अजिंठा चौकात आले असताना सुसाट ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. 

Jalgaon Accident
Dharangaon Accident : मित्राच्या वाढदिवसाचा केक आणायला जाताना मृत्यूने गाठले; दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात

ट्रक चालकाला दिले पोलिसांच्या ताब्यात 

अपघात घडल्यानंतर अजिंठा चौकात प्रचंड गोंधळ उडाला होता. तसेच वाहतूक कोंडी झाली होती. यामध्ये सदर ट्रक चालक हा घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र यावेळी येथे उपस्थित नागरिक व  धारकांनी ट्रक चालकाला लगेच अडवून पोलिसांना माहिती दिली. एमआयडीसी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले. तर शेळके यांना जिल्‍हा रुग्णालयात आणले. तपासणीअंती डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

Jalgaon Accident
Ulhasnagar Crime : शासकीय ओळखपत्र घालून आलेले तोतया अधिकारी ताब्यात; दोन महिलांचा समावेश

कुटुंबीयांचा आक्रोश 

रोज दहा वाजेच्या सुमारास घरी येणाऱ्या विठ्ठल शेळके यांचा परिवार त्यांची वाट पाहत होता. मात्र दहा मिनिटांच्या अंतरावर घर असलताना त्यांना मृत्यनं गाठले. दरम्यान यापघाताचे वृत्त कळताच शेळके कुटुंबीयांसह परिसरातील रहिवाशांनी जिल्‍हा रुग्णालयात धाव घेतली. पित्याचा मृतदेह पाहून मुलांनी एकच आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com