Maratha Reservation: ब्रेकिंग! मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे

Manoj jarange Patil: १७ दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. जरांगे पाटील हे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असून उद्यापासून साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Maratha Reservation Update
Maratha Reservation UpdateSaam Digital
Published On

Manoj jarange Patil Press Conference:

मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाबाबत महत्वाची अपडेट. १७ दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. जरांगे पाटील हे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असून उद्यापासून साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

राठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्या, हा मुद्दा लावून धरला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या १७ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते.

आज जरांगे पाटील यांनी हे उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. जरांगे पाटील हे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असून उद्यापासून साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच मराठा आंदोलनाची पुढील दिशा येत्या दोन दिवसात स्पष्ट करु.. असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Maratha Reservation Update
Mahesh gaikwad : उल्हासनगरमधील गोळीबारातून बचावलेल्या महेश गायकवाडांच्या स्वागतासाठी जोरदार बॅनरबाजी

दरम्यान, काल पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मनोज जरांगे पाटील हे फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे निघाले होते. जरांगेंच्या या भूमिकेमुळे राज्यभरात मराठा बांधवही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र आज  मनोज जरांगे पाटील यांनी भांबेरी गावातून पुन्हा जालन्याकडे परतण्याचा निर्णय घेतला. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Reservation Update
Dehu Road Railway Station : केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेअंतर्गत देहूरोड रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com