Mahesh gaikwad : उल्हासनगरमधील गोळीबारातून बचावलेल्या महेश गायकवाडांच्या स्वागतासाठी जोरदार बॅनरबाजी

Mahesh gaikwad banner in kalyan : तब्बल २४ दिवसांनी महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळणार आहे. महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी कल्याणमध्ये जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळत आहे.
Mahesh gaikwad
Mahesh gaikwadSaam tv

अभिजीत देशमुख, कल्याण

Ulhasnagar firing case :

उल्हासनगर गोळीबारातील गंभीर जखमी महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर आता तब्बल २४ दिवसांनी महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळणार आहे. महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी कल्याणमध्ये जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीचा वादातून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्या होत्या. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते . या उपचारादरम्यान डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे महेश गायकवाड यांच्या दीर्घ आयुष्यासाठी समर्थकांकडून होम हवन, मंत्र जप केले जात होते.

Mahesh gaikwad
Loksabha Election 2024: अमोल कोल्हेंसमोर उमेदवार शोधताना महायुतीची दमछाक, उमेदवार आयात करण्याची वेळ येण्याची शक्यता

खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर 24 दिवसानंतर महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे . आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास महेश गायकवाड हे कल्याणमध्ये दाखल होतील. यावेळी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahesh gaikwad
Maharashtra Budget Session : सरकारला आशा सेविकांची कदर नाही, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक, VIDEO

महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात जागोजागी बॅनर लावण्यात आले आहेत . शहरातील 'टायगर अभी जिंदा है' या आशयाचे बॅनर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत. तर साडेपाच वाजता महेश गायकवाड हे आपल्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. या घटनेनंतर महेश गायकवाड पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधणार असल्याने महेश गायकवाड काय बोलणार याकडे आता सर्वांचच लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com