Jalana News: हृदयद्रावक! बोअरवेल सुरू करताना विद्युत केबलने पेट घेतला.. महिलेचा होरपळून मृत्यू; जालना हळहळलं

Jalana News: स्वयंपाक घरात आलेल्या बोअरवेलच्या केबलला चिटकून लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबड शहरात घडली. या धक्कादायक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Jalana News:
Jalana News:Saamtv

जालना|ता. ३० एप्रिल २०२४

स्वयंपाक घरात आलेल्या बोअरवेलच्या केबलला चिटकून लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबड शहरात घडली. या आगीत घराचेही मोठे नुकसान झाले. या धक्कादायक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्वयंपाक करताना पाणी संपल्याने स्वयंपाक घरात असलेला बोअरवेलच्या सुरु करण्यासाठी गेलेल्या महिलेचा विद्युत केबलला चिटकून पूर्णपणे जळून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना अंबड शहरात घडली. पूजा मते असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

पूजा मते ह्या स्वयंपाक सुरु असताना स्वयंपाक घरातच असलेला बोअरवेल सुरु करण्यासाठी गेल्या. तेव्हा बोअरवेलच्या विदूत केबलला शॉक लागल्याने त्या तशाच चिकटून राहिल्या. तसेच त्याचा त्या ठिकाणी पूर्णपणे जळून घरात मोठा प्रमाणत धूर झाला. त्यानंतर पूजा यांच्यासह घरातील साहित्यांनी पेट घेतला. आग लागल्याची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

Jalana News:
Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

मात्र स्वयंपाक घरात ज्वलनशील पदार्थ असल्याने आगी जास्त भडकली आणि परिसरातील वीज ही बंद झाक्याने नागरिकांना आग विझवण्यासाठी शर्तीची प्रयत्न करावे लागले. यातच पूजा मते यांचा मृत्यू झाला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने संपूर्ण अंबड शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. घटनेची नोद अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहे.

Jalana News:
Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com