सांगली : माेदी, शहाच काय बीजीपे आमचं काही करु शकणार नाही. शेवटी तुम्ही एक गद्दार आहात, राजारामबापूंच्या पाठीत खंजीर खपूसलाय. तुम्हांला असं सहज साेपे जाऊ देणार नाही. वेट अॅन्ड वाॅच असा संदेश एकाने इस्लामपुरचे islampur नगराध्यक्ष आणि भाजपचे नेते निशिकांत पाटील nishikant patil यांना पाठवला आहे. जूलै महिन्यांत पाठविण्यात आलेला हा संदेश काेणी पाठवला याचा तपास अद्याप लागला नसल्याने भाजपचे BJP कार्यक्रर्ते आक्रमक झाले आहेत.
नगराध्यक्ष पाटील यांना परदेशातील क्रमांकावरुन व्हाट्सअप संदेश पाठवून धमकी देण्यात आल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मोदी, शहा, चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील यांच्या नावाचा उल्लेख या संदेशात आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यासाठी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी इस्लामपुर पोलिसात तक्रार केली आहे.
धमकी दिलेल्या संदेशात चंद्रकांत पाटील यांच्या मागे लपून जयंत पाटील यांच्यावर वार करू नका. माेदी, शहाच काय बीजीपे आमचं काही करु शकणार नाही. शेवटी तुम्ही एक गद्दार आहात, राजारामबापूंच्या पाठीत खंजीर खपूसलाय. तुम्हांला असं सहज साेपे जाऊ देणार नाही. वेट अॅन्ड वाॅच असंही संदेशाच्या अखेर म्हटलं आहे.
दरम्यान वाळवा तालुका हा सुसंस्कृत राजकारण्यांचा तालुका आहे. या तालुक्यातील नगराध्यक्षांना धमकीचा संदेश येणे आणि सुसंकृत राजकारणाला वेगळ्या दिशेने बघितले जाणे ही बाब चांगली नाही असे भाजपचे तालुका अध्यक्ष धैर्यशिल माेरे यांनी नमूद केले.
ते म्हणाले इस्लामपुरचे नगराध्यक्ष भाजपचे नेते निशिकांत पाटील यांना धमकीचा संदेश पाठविला गेला. त्यांना वारंवार त्रास दिला जात आहे. गेले दीड महिना झालं पाेलिसांना हा संदेश कुणी पाठवला याचा शाेध घेता आलेला नाही. पाेलिसांनी तातडीने तपास पुर्ण करावा अन्यथा भाजप आंदाेलन छेडू तसेच न्यायालयात धाव घेऊ असेही माेरे यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.