I Phone चे हप्ते थकले, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

Teen’s iPhone Demand Ends In Horror: छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर एका तरुणानं आत्महत्या केली... आत्महत्या करायला गेलेल्या तरुणाला वाचवताना आई-वडिलांचाही डोंगरावरून कोसळून मृत्यू झाला...मात्र तरुणानं आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला? तरुणांचा हट्ट कुटुंबियांच्या जीवावर कसा बेतलाय...पाहूयात या रिपोर्टमधून...
IPhone EMI Default Leads To Triple Tragedy At Khawadya Hill In Chhatrapati Sambhajinagar
IPhone EMI Default Leads To Triple Tragedy At Khawadya Hill In Chhatrapati Sambhajinagarsaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर आत्महत्या करणाऱ्या तरुणाला आयफोन देतो पण मागे फिर अस सांगणारा सरपंचाचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच...मात्र आता याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आलीय.....आयफोनचे हप्ते बाऊन्स झाल्यानं पैशांची मागणी या तरुणानं वडीलांकडे केली होती...मात्र वडीलांनी पैसे न दिल्यानं तरुणाचा वडीलांशी वाद झाला...आणि पुढे आत्महत्या करण्यासाठी हा तरुण थेट खवड्या डोंगरावर पोहचला..

दरम्यान मुलाला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी आईनंही डोंगराच्या क़ड्यावर उभं राहून आत्महत्या करण्याची धमकी दिली...“तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ, मी आत्ता मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्यासोबत येते, दोघे राहू, पण मला सोडून जाऊ नकोस” असं म्हणत आईनं मुलाला समजावलं...त्यामुळे आईही आत्महत्या करेल या विचारानं मुलगा मागे फिरायला तयार होता असे एका नव्या व्हिडिओतून समोर आलयं...

दरम्यान तरुणानं आत्महत्येचा निर्णय घेण्यापूर्वी नेमकं काय झालं होतं.पाहूयात...तरुणानं आत्महत्या कऱण्याचा हा प्रयत्न पाहिल्यांदाच केला नव्हता... वर्षभरापूर्वी 10वीच्या परिक्षेनंतर तरुणानं आई-वडीलांकडे आयफोनची मागणी केली होती...मात्र ट्रक चालक असणाऱ्या वडीलांनी आयफोन घेण्यास नकार दिला...ज्यामुळे वर्षभरापूर्वीही तरुणानं खवड्या डोंगरावर येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता...मात्र त्यावेळी आई-वडीलांनी आयफोन देण्यास तयारी दर्शवल्यावर त्याने आत्महत्येचा निर्णय मागे घेतला होता...मात्र यावेळी आयफोनच्या हप्त्याचा चेक बाऊंन्स झाल्यानं आणि वडीलांनी खर्चाला पैसे न दिल्यानं तरुणानं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जातयं...

दरम्यान यावेळी खवड्या डोंगरावर वडील मुलाला आत्महत्येपासून वाचवायला गेले आणि तोल जाऊन दोघांचाही मृत्यू झाला. नवऱ्याचा आणि मुलाचा मृत्यू डोळासमोर पाहणाऱ्या आईनंही लगोलग डोंगरावरून उडी मारून जीवन संपवलं.

विशेष म्हणजे, ज्या खवड्या डोंगरावरून मुलासह आई-वडीलांचाही मृत्यू झाला...तो खवड्या डोंगरही आता अवैध उत्खनानामुळे मृत्यूचा सापळा झाल्याचं समोर आलयं...ना सुरक्षा कठडा, ना फलक यामुळे तिसगावजवळील खवड्या डोंगर जणू सुसाईड पॉईंट ठरलाय.. गेल्या चार वर्षात या डोंगरावर 13 जणांनी आत्महत्या केलीय. तर एका हत्येच्या प्रकरणानेही ही जागा चर्चेत आहे. तरीही प्रशासनानं कुठलीच ठोस उपाययोजना केलेली नाही... त्यामुळे आत्महत्येचे हे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनानं खबरदारी घ्यायला हवी..

तसचं आई-वडीलांकडे चैनीच्या वस्तुंची मागणी करून आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयापर्यंत जाणं कधीच पर्याय ठरू शकत नाही...यामुळे संपूर्ण कुटुंबाचा जीव धोक्यात येऊ शकतो... याचा विचार तरुणांनी नक्कीच करायला हवा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com