शिवसेना खा.प्रतापराव जाधव व आ.संजय गायकवाड यांच्या संपत्तीची ED मार्फत चौकशी करा - कवाडे

शिवसेना खासदार प्रतापराव जाधव व बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या संपत्तीची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे.
शिवसेना खा.प्रतापराव जाधव व आ.संजय गायकवाड़ यांच्या संपत्तीची ED मार्फत चौकशी करा - कवाडे
शिवसेना खा.प्रतापराव जाधव व आ.संजय गायकवाड़ यांच्या संपत्तीची ED मार्फत चौकशी करा - कवाडेSaamTv

संजय जाधव

बुलढाणा : खामगाव-बुलढाणा लोकसभेचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव व बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या संपत्तीची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी केल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. Investigate the assets of Shiv Sena MP Prataprao Jadhav and MLA Sanjay Gaikwad through ED - Kawade

हे देखील पहा -

चितोडा प्रकरणात खासदारार प्रतापराव जाधव यांनी पीडित कुटुंबाकडे पैसा आला कुठून असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी उत्तर देत शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी कमावलेल्या गडगंज संपत्तीची व आमदार संजय गायकवाड यांची सुद्धा ईडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

शिवसेना खा.प्रतापराव जाधव व आ.संजय गायकवाड़ यांच्या संपत्तीची ED मार्फत चौकशी करा - कवाडे
बीड राजीनामासत्र सुरूच; केजच्या पंचायत समिती सभापतींसह चार सदस्यांनी दिले राजीनामे !

मातोश्री व उद्धव ठाकरे यांना बदनाम करणाऱ्या आमदार गायकवाड यांची पक्षातुन हकालपट्टी करा...

शिवसेनेची सगळी सूत्रे जिथून हलतात त्या मातोश्री निवासस्थानास व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बदनाम करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांची हकालपट्टी करा, तसेच केंद्र सरकारने तय्यार केलेल्या ऍट्रॉसिटी कायद्याची पायमल्ली करणाऱ्या संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी देखील प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. ते बुलढाणा जिल्ह्यातील चितोडा गावाला भेट देण्यासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.

या राज्यात फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र चितोडा प्रकरणात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी ऍट्रॉसिटी कायद्याविरोधात बेताल वक्तव्य करत या महाराष्ट्रातील दलितांना एकप्रकारे धमकावण्याचेच काम केले आहे. त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरीत कार्रवाई करावी अन्यथा पिपल्स रिपब्लिकन पक्ष राज्यात मोठे आंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com