Kavita Raut News: ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत नोकरीच्या प्रतिक्षेत! 'आदिवासी असल्यानेच माझ्यावर अन्याय', राज्य सरकारवर केले गंभीर आरोप

international Runner Kavita Raut News: आदिवासी असल्याने आणि पाठीशी कुणीही गोड फादर नसल्यानं १० वर्षांपासून राज्य सरकारी नोकरीत डावललं जात आहे, असं त्या म्हणाल्यात.
Kavita Raut News: ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत नोकरीच्या प्रतिक्षेत! 'आदिवासी असल्यानेच माझ्यावर अन्याय', राज्य सरकारवर केले गंभीर आरोप
international Runner Kavita Raut News: Saamtv
Published On

नाशिक, ता. २९ ऑगस्ट २०२४

एकीकडे पेसा भरतीवरुन आदिवासी बांधव आक्रमक झाले असतानाच आदिवासी असल्यानेच राज्य सरकारकडून १० वर्षांपासून माझ्यावर अन्याय होत आहे, असे गंभीर आरोप करत सावरपाडा एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिंपिक धावपटू कविता राऊत यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. आदिवासी असल्याने आणि पाठीशी कुणीही गोड फादर नसल्यानं १० वर्षांपासून राज्य सरकारी नोकरीत डावललं जात आहे, असं त्या म्हणाल्यात.

Kavita Raut News: ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत नोकरीच्या प्रतिक्षेत! 'आदिवासी असल्यानेच माझ्यावर अन्याय', राज्य सरकारवर केले गंभीर आरोप
Pooja Khedkar News: पूजा खेडकरच्या जामीनावर आज फैसला! दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी; अटकेचे संरक्षण संपल्याने कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

काय म्हणाल्यात कविता राऊत?

'मी आदिवासी असल्यानेच राज्य सरकारकडून १० वर्षांपासून अन्याय होत आहे. आदिवासी असल्याने आणि पाठीशी कुणीही गोड फादर नसल्यानं १० वर्षांपासून राज्य सरकारी नोकरीत डावललं जात असून 2014 ते 2024 असे दहा वर्ष मी मंत्रालयात चक्कर मारतेय, मात्र अजूनही माझं काम होत नाहीये, राज्य सरकारी नोकरीसाठी दहा वर्ष का लागले याचे उत्तर सरकारने द्यावं?' असा सवाल उपस्थित करत अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिंपिक धावपटू कविता राऊत यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

१० वर्षांपासून माझ्यावर अन्याय

"माझ्या बरोबरीच्या खेळाडूंना राज्य सरकारनं क्लास वन अधिकारी केलं, मात्र माझ्यावर १० वर्षांपासून अन्याय केला. महाराष्ट्रात राहून मला माझ्या समाजासाठी काहीतरी करायचंय, यासाठी मी महाराष्ट्र सरकारला नोकरी मागते. जुन्या जीआरनुसार जे माझ्या बरोबरीच्या खेळाडूंना दिलं ते मलाही देण्यात यावे हीच माझी मागणी आहे," असे कविता राऊत यांनी म्हटले आहे. सध्या त्या ओएनजीसीमध्ये सिनियर एक्झिक्यूटिव्ह म्हणून डेहराडून इथे कार्यरत आहेत.

Kavita Raut News: ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत नोकरीच्या प्रतिक्षेत! 'आदिवासी असल्यानेच माझ्यावर अन्याय', राज्य सरकारवर केले गंभीर आरोप
Maharashtra Politics : विधानसभेसाठी संघाचा नवा प्लान? सत्तेसाठी गडकरींना गळ?, केंद्रातला चेहरा महाराष्ट्रात आणण्याची रणनीती?

'आदिवासी आंदोलनात राजकारण', आमदाराची नाराजी

तर दुसरीकडे नाशिकमध्ये पेस भरती संदर्भातील झालेल्या आदिवासी बांधवांच्या आंदोलनात काही जणांनी राजकारण केल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कळवणचे आमदार नितीन पवार यांनी केला आहे. यावरुनच त्यांनी माजी आमदार जे पी गावित यांच्यावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.

पेसा भरतीसाठी काल नाशिक शहरामध्ये आदिवासी संघटनांचा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर जाहीर सभा झाली, या सभेत आदिवासी लोकप्रतिनिधींना बोलू न दिल्याने आमदार नितीन पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काल झालेल्या आदिवासी बांधवांच्या मोर्चात लोकप्रतिनिधींना बोलू द्यायला हवं होतं, बोलू दिलं नाही, तरी आदिवासींच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलनाला पाठिंबा असेल, असे पवार यांनी म्हटले आहे.

Kavita Raut News: ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत नोकरीच्या प्रतिक्षेत! 'आदिवासी असल्यानेच माझ्यावर अन्याय', राज्य सरकारवर केले गंभीर आरोप
Ulhasnagar Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, भेटायचा प्लान अन्... उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडिता गर्भवती

आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक!

दरम्यान, पेसा पदभरती आणि आदिवासींच्या अन्य प्रश्नांबाबत आज दुपारी मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आदिवासी संघटनांची बैठक होणार आहे. गेल्या महिनाभरापासून नाशिकमध्ये पेसा भरतीसाठी आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरू आहे. पैसाभरती रखडल्याने पात्र आदिवासी विद्यार्थी सरकारी नोकरीपासून वंचित आहेत.

आदिवासींच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काल नाशिकमध्ये राज्यभरातील आदिवासी बांधवांनी महामोर्चाही काढला होता. त्यानंतर आदिवासींचे प्रश्न आणि मागण्यांबाबत आज मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जे पी गावित, चिंतामण गावित, भास्कर गावित, भारती पवार, आमदार नितीन पवार उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com