Satara News : औषध विक्रेत्यांसाठी सातारा जिल्हाधिका-यांचा आदेश, दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनाकरक

नव्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी असे आदेशात म्हटले आहे.
CCTV Camera, satara
CCTV Camera, satarasaam tv
Published On

Satara News : सातारा जिल्ह्यातील किरकोळ औषधे परवाना धारकांनी त्यांच्या दुकानात एक महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असा आदेश प्रशासनाने काढला आहे. याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त म.स. जवंजाळ-पाटील यांनी दिली. (Maharashtra News)

CCTV Camera, satara
FRP For Sugarcane : प्रशासन, साखर कारखानदारांच्या बैठकीतून बाहेर पडताच राजू शेट्टी सरकारवर बरसले

गुंगी कारक औषधांच्या अवैध विक्रीवर लक्ष ठेण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडू (jitendra dudi ias) यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. या आदेशात सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज आवश्यकते प्रमाणे औषध निरीक्षक, बालकल्याण पोलीस अधिकारी आणि शासनाने अथवा जिल्हादंडाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना पडताळणीसाठी उपलब्ध करुन देणेही बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान जिल्ह्यातील किरकोळ औषधे परवाना धारकांनी त्यांच्या दुकानात एक महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे न बसविल्यास त्यांच्या नियमभंगाची कारवाई हाेऊ शकते अशी चर्चा शहरात सुरु झाल्याने औषध विक्रेते धास्तावले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

CCTV Camera, satara
Kolhapur : जून्या निर्णयावर पालकमंत्री ठाम, ग्रामस्थांनी काेल्हापुरातील 18 गावे बंद ठेवत हसन मुश्रीफांना दाखविली एकजूट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com