Indrapur Accident News: भरधाव ट्रकने तरुणाला चिरडले; संतप्त जमावाने पेटविला ट्रक, पोलीस कर्मचारी जखमी

Indrapur News: भरधाव ट्रकने तरुणाला चिरडले; संतप्त जमावाने पेटविला ट्रक, पोलीस कर्मचारी जखमी
Indrapur Accident News
Indrapur Accident NewsSaam tv
Published On

इंदापूर : इंदापूरच्या बाह्य वळणावर भीषण अपघात झाला असून या अपघातात भरधाव ट्रकने एकास चिरडले. या (Accident) अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याची घटना घाली आहे. हा पेटवलेला ट्रक विझवताना पोलीस (Police) कर्मचारी जखमी झाला आहे. (Latest Marathi News)

Indrapur Accident News
Jalgaon News: अपत्य नसल्याने घेतले दत्तक; रेल्वे प्रवासात एक महिन्याच्या चिमुकलीसोबत घडले विपरीत, माता- पित्याचा आक्रोश

पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहराच्या बाह्यवळणावर भीषण अपघात झाला. एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वरास चिरडल्याची घटना घडली आहे. यात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. दशरथ मारुती चोरमले असं मयत दुचाकीस्वाराचे नाव असून तो इंदापूर नजीक असणाऱ्या काळके वस्ती गलांडवाडी नंबर एक येथील रहिवासी आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Indrapur Accident News
Bhivandi Crime News: ऑनलाइन गेमिंगमुळे हवालदार कर्जबाजारी; कर्ज फेडण्यासाठी केलेल्या गोळीबारात तरूणाचा गेला जीव

पोलीस कर्मचारी जखमी 
सदर ट्रक सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने निघाला होता. या दरम्यान दुचाकीवरील दशरथ मारुती चोरमले हे दूध विक्री करुन घरी निघाले असता त्यांना या ट्रकने चिरडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दुर्गेश्वरी हाॅटेल समोर हा अपघात घडला असून संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. या दरम्यान पेटवलेला ट्रक विझवण्याचा प्रयत्न करताना इंदापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन नरळे यांना किरकोळ भाजल्याची माहिती मिळत आहे. इंदापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केलाय. इंदापूर नगर परिषदेच्या अग्निशामकच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com