
जागतिक सुवर्ण परिषदेनं नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केलायं. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, भारतीय महिलांमध्ये सोन्याची आणि दागिन्यांची मोठी क्रेझ आहे हे स्पष्ट झालंय़.. भारतीय महिलांकडे एकूण 24 हजार टन सोनं असल्याचं या अहवालातून समोर आलंय. मात्र सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे भारतातही दक्षिण भारतातील महिलांकडे सर्वाधिक सोनं आहे. तामिळनाडूतील महिलांकडे जगात सर्वाधिक सोने असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून
भारतातील महिलांकडे 24 हजार टन सोनं
दक्षिण भारतातील महिलांकडे 9 हजार 600 टन सोनं
अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स आणि रशियाच्या महिलांपेक्षा तामिळनाडूतील महिलांकडे अधिक सोनं
तामिळनाडूतील महिलांकडे तब्बल 6 हजार 720 टन सोनं
सोन्याच्या किंमती वाढल्यानंतरही सोने खरेदीकडे कल
सोन्याचे दागिने परंपरा आणि संस्कृतीचा भाग आहेत. भारतात सोन्याला संपत्ती आणि समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. तर भारतीय परंपरेत जन्मापासून लग्नापर्यंत सोन्याच्या दागिन्यांना विशेष स्थान आहे. त्यातचं सोनं खरेदी हा गुंतवणूकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो. अडीअडचणीच्या काळातही सोन्याचा वापर करण्याची पद्धत दिसते. जगभरात कोणत्या देशात किती सोनं आहे पाहूया...
कोणत्या देशात किती सोनं -
अमेरिका - 8 हजार टन
जर्मनी - 3 हजार 300 टन
इटली - 2 हजार 450 टन
फ्रान्स- 2 हजार 400 टन
रशिया - 1900 टन
तर भारतीय महिलेला किती सोनं बाळगण्याची मुभा देण्यात आलीये.भारतीय आयकर कायद्यानुसार कोण किती सोनं बाळगू शकतो...
तुम्ही किती सोनं बाळगू शकता? -
विवाहित महिला- 500 ग्रॅम
अविवाहित महिला- 250 ग्रॅम
पुरुष- 100 ग्रॅम
भारतात सोन्याला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं.सोन्याच्या भावात वाढ होऊनही लोकांची दागिने खरेदीची उत्सुकता कमी झालेली नाही.लोकांमध्ये दागिने खरेदीची क्रेझ कायम आहे. एकेकाळी भारतातून सोन्याचा धूर निघत असे असं म्हणतात ते उगाच नाही...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.