
दिवाळी आणि छठपूजेसाठी रेल्वे प्रशासनाने १,७०२ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूरसह सहा ठिकाणांहून देशभरात गाड्या सुटतील.
प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त तिकीट काउंटर आणि प्रतीक्षा क्षेत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
Special Trains Update : प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळी आणि छठपूजेच्या निमित्ताने रेल्वे प्रशासनाने १,७०२ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कामासाठी घर सोडून महानगरात आलेल्यांना सणासुदीला घरी जाता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात मध्य रेल्वेचे सीपीआर स्वप्नील निला यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे.
'मध्य रेल्वे दिवाळी आणि छठनिमित्त १,७०२ विशेष गाड्या चालवत आहे. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर येथून निघतील. यांपैकी ८०० हून अधिक गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांसाठी असतील. याव्यतिरिक्त देशाच्या इतर भागांमध्येही गाड्या जातील. वाशांच्या सोयीसाठी प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त तिकीट काउंटर सुरू करण्यात आले आहेत', असे स्वप्नील निला यांनी सांगितले.
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रमुख रेल्वे स्थानकांवर ३,००० पेक्षा जास्त प्रवाशांची क्षमता असलेले प्रतीक्षा क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. या प्रतीक्षा क्षेत्रांमध्ये अन्न, पाणी, स्वच्छतागृहे आणि पंखे यासारख्या सुविधा आहेत. याशिवाय तिकीट बुकिंगसाठी मोबाईल यूटीएस सेवा उपलब्ध आहे, तसेच अतिरिक्त तिकीट काउंटर देखील उघडण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.
उत्तर पश्चिम रेल्वेने दिवाळी आणि छठसाठी विशेष व्यवस्था केली आहे. मुंबई, पुणे, हावडा आणि बिहार येथून जवळच्या भागात ४४ जोड्या विशेष गाड्या धावत आहेत. दिवाळी आणि छठसाठी ४४ जोड्या विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. गरजेनुसार आणखी गाड्या जोडता येतील. याव्यतिरिक्त, ६० नियमित गाड्यांमध्ये १७४ अतिरिक्त कोच जोडण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यासाठी जयपूरसारख्या प्रमुख स्थानकांवर प्रतीक्षालय तयार करण्यात आले आहेत, असे उत्तर पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ कॅप्टन शशी किरण यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.