10 लाखांचे कर्ज काढले अन्...; घरकाम करणाऱ्या महिलेने 60 लाखांचा 3 BHK फ्लॅट खरेदी केला, प्रकरण कळताच नेटकरी हैराण

Viral : सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या व्हायरल पोस्टमध्ये एका कंटेंट क्रिएटरने तिच्या घरी काम करणाऱ्या महिलेने ६० लाख रुपयांचा ३ बीएचके फ्लॅट खरेदी केल्याचे म्हटले.
viral news
viral newsx
Published On
Summary
  • सोशल मीडियावर एका कंटेंट क्रिएटरने एक व्हिडीओ शेअर केला.

  • या व्हिडीओमध्ये तिने घरकाम करणाऱ्या महिलेने ३ बीएचके फ्लॅट खरेदी केल्याचे म्हटले.

  • महिलेने १० लाखांचे कर्ज घेऊन ६० लाखांचा ३ बीएचके फ्लॅट खरेदी केल्याचे सांगितले.

Property Investment : महानगरांमध्ये, मोठ्या शहरांमध्ये घर खरेदी करणे सोपे काम नाही. घरासाठी कर्ज घेताना खूप विचार करावा लागतो. घरांच्या वाढत्या किमती, जास्त कालावधीचे हफ्ते आणि घर सजावटीच्या खर्चांमुळे अनेकांना स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करायला बरीच वर्षे लागतात. पण सुरतमध्ये फक्त १० लाखांचे कर्ज घेऊन एका महिलेने ६० लाख किमतीचा ३ बीएचके फ्लॅट खरेदी केल्याचे सांगत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

कंटेंट क्रिएटर नलिनी उंगार यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. 'एके दिवशी माझ्या घरी काम करायला येणारी महिला आनंदात सांगू लागली, तिने सुरतमध्ये ६० लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी केला. तसेच फर्निचरसाठी ४ लाख रुपये खर्च केले होते. तिने या सर्व गोष्टी फक्त १० लाखांचे कर्ज घेतले होते', असे नलिनी उंगार यांनी पोस्टमध्ये म्हटले.

घरकाम करणाऱ्या महिलीची ही पहिली मालमत्ता नाहीये. तिचे गुजरातमधील वेलांजा गावात आधीच एक दुमजली घर आणि एक दुकान आहे, या दोन्ही गोष्टी त्या महिलेने भाड्याने दिल्या आहेत, असेही नलिनी उंगार यांनी म्हटले. घरकाम करणाऱ्या महिलेचे बोलणे ऐकून मी पूर्णपणे नि:शब्द झाले आणि हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला.

viral news
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी मिळणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

सोशल मीडियावर कंटेंट क्रिएटर नलिनी उंगार यांनी शेअर केलेल्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. घरकाम करणाऱ्या महिलेने हुशारीने बचत करत अनावश्यक खर्च टाळल्याने घर खरेदी केले. घरी काम करायला येणाऱ्यांना आपण गरीब समजतो. पण त्यांपैकी बऱ्याच जणांकडे पैसे असतात. ते हुशारीने पैश्यांचे व्यवहार करतात, वेळोवेळी बचत करतात.

viral news
नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com