Moody's on Indian Economy : अर्थव्यवस्थेच्या वेगाचा 'मूड' बदलला! 'मूडीज'ने GDP वाढीचा अंदाज ६.१ टक्क्यांवरुन ६.८ टक्क्यांवर

Moody's on GDP Growth Rate : मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने म्हटले आहे की, २०२३ मध्ये मजबूत वाढीच्या परिणामांमध्ये सरकारी भांडवली खर्च आणि मजबूत विकासकामांचं योगदान आहे.
Moodys
Moodys Saam TV
Published On

New Delhi News :

भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. जागतिक स्थरावर देखील भारताच्या आर्थिक वृद्धीची दखल घेतली जात आहे. भारतीयांसाठी आणखी एक खूशखबर आहे. जागतिक रेटिंग संस्था मूडीजने भारताचा जीडीपी वाढीचा २०२४ साठीचा अंदाज ६.१ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांपर्यंत वाढवला. भारताचा जीडीपी वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाहीत वार्षिक ८.४ टक्क्यांनी वाढला. परिणामी संपूर्ण वर्ष २०२३ साठीचा जीडीपी ७.७ टक्के वाढला.

मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने म्हटले आहे की, २०२३ मध्ये मजबूत वाढीच्या परिणामांमध्ये सरकारी भांडवली खर्च आणि मजबूत विकासकामांचं योगदान आहे. त्यामुळे जीडीपीच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Moodys
Loksabha Election : 'मैं भी चौकीदार'नंतर २०२४साठी खास मोहीम! जेपी नड्डा, अमित शहांसह सर्व नेत्यांनी बदलले ट्वीटर बायो, नवी ओळख काय?

जागतिक आव्हाने कमी झाल्याने भारतीय अर्थव्यवस्था ६-७ टक्के जीडीपी वाढ नोंदवू शकते. भारताच्या अर्थव्यवस्थेने चांगली कामगिरी केली आहे आणि २०२३ मधील ती अपेक्षेपेक्षा अधिक मजबूत राहील, असा विश्वास मूडीजने व्यक्त केला आहे.

जी-२० अर्थव्यवस्थांमध्ये भारत सर्वात वेगाने वाढणारा देश राहण्याचा अंदाज आहे. वस्तू आणि सेवा कर (GST) कलेक्शनची वाढ, वाहनांच्या विक्रीतील वाढ, आणि कर्जदारांची वाढती संख्या असं दर्शवते की शहरी भागात मागणी मजबूत होत आहे. (Latest Marathi News)

Moodys
Tata Motors Demerger: मोठी बातमी! टाटा मोटर्स आपला व्यवसाय दोन भागात विभागणार, नेमकं काय आहे कारण?

भारत सरकारच्या भांडवली खर्चात वाढ करण्याच्या निर्णयाचा परिणाम झाल्याचे मूडीजने मान्य केले आहे. त्यामुळे उत्पादन क्षेत्रानेही चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. जानेवारी-मार्च २०२४ तिमाहीतही विकासदराची गती कायम राहील, असा विश्वासही मूडीजच्या अहवालात व्यक्त केला आहे.

आगामी सार्वत्रिक निवडणुकांनंतरही पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी गुंतवणूक सुरू राहण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी याचा फायदा होईल, असं मूडीजने म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com