नाशिककरांना कोजागिरी महागात! गायी, म्हशीच्या दूध दरात वाढ

आजच्या दिवशी दुधासाठी जरा जास्त खिसा रिकामा करावा लागणार
नाशिककरांना कोजागिरी महागात! गायी, म्हशीच्या दूध दरात वाढ
नाशिककरांना कोजागिरी महागात! गायी, म्हशीच्या दूध दरात वाढSaam Tv
Published On

नाशिक : आज कोजारी पौर्णिमा आहे. कोजागिरी निमित्ताने आपण कुटुंबीय, नातेवाईक किंवा मित्रमंडळींसह दूध पिण्याचा बेत आखला असणार आहे. परंतु, नाशिककरांना मात्र, आजच्या दिवशी दुधासाठी जरा जास्त खिसा रिकामा करावा लागणार आहे. कारण नाशिकमध्ये आज म्हशीच्या दुधाच्या भाव हे प्रतिलिटर १४ ते २० रुपयांनी, तर गायीच्या दुधाचे भाव हे प्रतिलिटर १० रुपयांनी वाढविण्यात आले आहेत.

हे देखील पहा-

दरम्यान, दर वाढले असले, तरी नाशिककरांनी दूध खरेदीकरिता सकाळपासूनच रांगा लावल्याचे बघायला मिळत आहे. आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुधाला विशेष महत्त्व देण्यात येते. आजच्या दिवशी रात्री दूध आटवून त्याचा देवीला नैवेद्य दाखवला जातो. यानंतर कुटुंबीय किंवा मित्रमंडळी याचे दूध प्राशन करतात. त्यामुळे आज दुधाला मोठी मागणी असते. परिणामी दरवर्षीप्रमाणेच या वर्षी देखील दुधाचे भाव महागले आहेत.

नाशिककरांना कोजागिरी महागात! गायी, म्हशीच्या दूध दरात वाढ
Red alert: पावसामुळे उत्तराखंडमध्ये हाहाकार...(पहा व्हिडिओ)

आज म्हशीच्या दुधाची काही ठिकाणी भाव ८० रुपये, तर काही ठिकाणी १०० रुपयांनी विक्री होत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे अगदी पहाटेपासून नागरिक दूध खरेदीकरिता घराबाहेर पडले, असून दुकानांबाहेर काही किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com