Red alert: पावसामुळे उत्तराखंडमध्ये हाहाकार...(पहा व्हिडिओ)

मुसळधार पावसाने उत्तराखंड मोठ्या प्रमाणात उध्वस्त झाले आहे
Red alert: पावसामुळे उत्तराखंडमध्ये हाहाकार...(पहा व्हिडिओ)
Red alert: पावसामुळे उत्तराखंडमध्ये हाहाकार...(पहा व्हिडिओ)Saam Tv
Published On

वृत्तसंस्था : मुसळधार पावसाने उत्तराखंड मोठ्या प्रमाणात उध्वस्त झालले आहे. ठिकठिकाणी भूस्खलनामुळे किमान ६ जणांसह ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यासह, रामनगर मधील कोसी नदीच्या पाण्याच्या पातळीत सतत वाढ झाल्यामुळे, अनेक रिसॉर्ट्समध्ये देखील पाणी भरले आहे. नैनीताल मधील रामगढचा संपूर्ण परिसर हा पाण्याखाली गेल्यामुळे अनेक लोक मदतीची याचना करत आहेत.

हे देखील पहा-

तसेच अल्मोडामध्ये काही लोक घराच्या ढिगाऱ्याच्या खाली दबले गेले आहेत, पण परिस्थिती खराब असल्यामुळे बचाव पथकांना देखील त्याठिकाणी पोहोचण्यास अडचण येत आहे. पौरीच्या लान्सडाउन मध्ये एका नेपाळी कुटुंबात ३ लोकांचा भूस्खलनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, चंपावत जिल्ह्यात अशाच एका अपघातामध्ये २ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

रुद्रप्रयाग जिल्ह्यातील कानपूरहून आलेल्या एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. चार धाम यात्राही बंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे नैनीताल मधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Red alert: पावसामुळे उत्तराखंडमध्ये हाहाकार...(पहा व्हिडिओ)
मराठी विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त पालिका कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ

पावसामुळे नैनीताल मधील ९ रस्ते बंद झाले आहेत, तर नैनीताल भोवली, काळधुंगी नैनीताल रस्त्यावर ढिगारा पडला असल्यामुळे तो बंद करण्यात आला आहे. तर, नैनीताल हल्दवानी रस्ताही बंद करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतरही रस्त्यावर जामची परिस्थिती आहे, यामुळे अनेक पर्यटक परत येत आहेत, यामुळे धोका निर्माण झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com