सांगा तिसरी लाट कशी रोखणार? अकोल्यात 23 टक्के नागरिकांचे लसीकरण अजूनही बाकी!

गेल्या काही दिवसापासून अकोला जिल्ह्यात कोविडच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने अकोलेकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
Akola Local News Updates
Akola Local News UpdatesSaam Tv
Published On

जयेश गावंडे

अकोला : गेल्या काही दिवसापासून अकोला जिल्ह्यात कोविडच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने अकोलेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. एक अंकी सक्रिय रुग्णसंख्या असणाऱ्या अकोल्यात आता 119 वर सक्रिय रुग्णांची संख्या गेली आहे. त्यामुळे ही स्थिती पाहता अकोला जिल्ह्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट दिसून येत आहे. (Akola Local News Updates)

मात्र, अद्यापही अकोला (Akola) जिल्ह्यातील 23 टक्के लोकांनी लसीचा एकही डोस घेतला नाही. कोविडचा (Covid) संभाव्य धोका पाहता 15 ते 18 वर्ष वयोगटातील बालकं उत्साहाने लस घेत असले, तरी मोठ्यांना मात्र अजूनही लसीचे महत्त्व कळलेलं दिसून येत नाही. सुमारे चार महिन्यापासून अकोला जिल्ह्यातील कोविडची स्थिती नियंत्रणात आहे. या काळात बहुतांश लोकांच्या लसीकरणाचा टप्पा गाठण्यात आला. (Akola News in Marathi)

Akola Local News Updates
पोलिसाची खलबत्याने ठेचून हत्या; कल्याणमध्ये मुलीच्या नांदण्यावरुन कुटुंबानेच घेतला बळी

सुमारे 11 लाख 13 हजार 147 लोकांनी लसीचा पहिला, तर 6 लाख 16 हजार 669 लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, मागील चार दिवसांत अकोला जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 119 वर पोहोचल्याने तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका वर्तविला जात आहे. अशा परिस्थितीत प्रतिबंधात्मक उपाय हाच सुरक्षेचा पर्याय ठरतो. (Latest Akola News in Marathi)

हे देखील पहा-

त्यातीलच एक पर्याय लसीकरणाचा (Vaccination) आहे, या सोबतच नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या त्रिसूत्रीच पालन करणं महत्वाचं आहे. मास्क सोशल डिस्टंसिंग (Social Distancing) आणि वेळोवेळी हात स्वछ ठेवणे. यामुळे नागरिक स्वताचाही आरोग्य उत्तम ठेवू शकतील आणि इतरांचेही. त्यामुळे लसीकरण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सर्वांनी घ्यावं करून, हे कोविड लसीकरण गीत
सर्वांनी घ्यावं करून, हे कोविड लसीकरण गीतजयेश गावंडे

सर्वांनी घ्यावं करून, हे कोविड लसीकरण... अकोला उपजिल्हाधिकाऱ्यांनी केले गीतातून आवाहन;

सर्वांनी घ्यावे करून कोरोना लसीकरण ... सध्या हे गीत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासन मोठ्या प्रमाणात व्हायरल करतेय. विशेष म्हणजे हे गीत उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे आणि त्यांच्या पत्नी नीता खडसे यांनी गायलंय. कोविड लसीकरण जागृती व्हावी यासाठी तयार करण्यात आलेल्या या गीताचे विमोचन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

गीताच्या माध्यमातून कोविड लसीकरणाचे महत्त्व नागरिकांना पटवून देणे महत्त्वाचे असल्याने हे गीत तयार करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितलंय. अकोल्यात या गीताचे चित्रीकरण करण्यात आले. प्रसिद्ध नृत्य कलाकार रहीम शेख यांच्या चमूने या गीतावर नृत्य केलंय. तर उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे आणि नीता खडसे यांनी सुरेल आवाजात या हे गीत गायलंय. तिसऱ्या लाटेला सध्या सुरुवात झाली असून कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने सर्वांनी लसीकरण करून राक्षसरूपी कोरोनाला हद्दपार करण्याचे आवाहन या गीतातून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com