Imtiaz Jalil: नितेश राणे देवेंद्र फडणवीस यांनी सोडलेले पिल्लू; माजी खासदार जलील यांचा हल्लाबोल

Imtiaz Jalil: वारंवार करण्यात येणाऱ्या वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी इम्तियाज जलील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
Imtiaz Jalil: नितेश राणे देवेंद्र फडणवीस यांनी सोडलेले पिल्लू; माजी खासदार जलील यांचा हल्लाबोल
Published On

रामू ढाकणे , साम प्रतिनिधी

मुस्लीम समाजाला वारंवार टार्गेट करत भाजप नेते वादग्रस्त विधान करतात, ते देवेंद्र फडणवीस यांनी सोडलेलं एक पिल्लू आहे, अशी टीका माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नितेश राणे यांच्यावर नाव न घेता केली. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंवर जे लोक बोलत आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई करावी, ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. यासाठी ते २३ तारखेला मुंबईला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिलीय.

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते नितेश राणे हे दोन धर्मात तेढ निर्माण करणारी विधानं करत आहेत. त्याचबरोबर रामगिरी महाराज यांनी अहमदनगरमध्ये मुस्लीम धर्मगुरू पैंगबर मोहम्मद आणि धर्माविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. नितेश राणे वारंवार मुस्लीम धर्माविषयी वादग्रस्त विधाने करत आहेत, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी माजी खासदार इम्तियाज जलील मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. राज्यात कायदा, कानून सुव्यवस्था आहे. त्यामुळे देश आपल्याला संविधानाने चालवायचा आहे की, असा गुंडगिरीने चालवायचा आहे, हा असा सवाल केला जाणार आहे.

Imtiaz Jalil: नितेश राणे देवेंद्र फडणवीस यांनी सोडलेले पिल्लू; माजी खासदार जलील यांचा हल्लाबोल
Waqf Amendment Bill 2024: 'नमाज पठण माझा अधिकार, तोही हिरावून घेणार का?'; वक्फ सुधारणा विधेयकावर असदुद्दीन ओवेसी लोकसभेत कडाडले

आपल्याला देश संविधानानुसार चालवायचा आहे, ही आठवण करून देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना संविधान असल्याचं जलील म्हणालेत. यावेळी त्यांनी नितेश राणे यांच्यावर त्यांनी टीका केली असून देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर बोलत असल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय. भापजचे जे नेते वारंवार मुस्लीम समाजाविषयी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केली जात आहे, ते देवेंद्र फडणवीस यांनी सोडलेलं पिल्लू असल्याची टीका त्यांनी नितेश राणे यांचे नाव न घेता केलीय.

वादग्रस्त विधाने करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आपण करणार असून त्यासाठी आम्ही मुंबईला जाणार आहे आम्हाला कोणी रोखू शकत नाही. आम्ही कुठल्या पक्षाकडून नाही तर मुस्लीम समाजाच्या धर्मगुरूंना जी लोक बोलली त्यांच्याविरोधात कारवाई करावी या मागणीसाठी मुंबईला जाणार असल्याचं इम्तियाज जलील यांनी सांगितलंय. यामुळे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी आम्हाला नोटीस देण्याचा प्रश्नच येत नाही.

आम्ही शहरात काहीच करणार नाही, आम्ही मुंबईला जाऊन फक्त भेटणार असल्याचही त्यांनी सांगितलं. आपण २३ तारखेला मुंबईकडे मोठ्या संख्येने निघणार असल्याची माहिती जलील दिली. रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांनी जी विवादास्पद वक्तव्य केली आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही मुंबईला मुख्यमंत्र्यांना जाऊन संविधानची प्रत भेट देणार असल्यास जलील यांनी सांगितलं.

Imtiaz Jalil: नितेश राणे देवेंद्र फडणवीस यांनी सोडलेले पिल्लू; माजी खासदार जलील यांचा हल्लाबोल
Maharashtra Politics : एमआयएमच्या २ गटात तुफान राडा, जलील यांच्यासमोरच बाचाबाची, नेमकं झालं काय? VIDEO

धारावी मशिदी बाबत काहीही चुकीचं नव्हतं. सरकारला राज्यात दंगली करायच्या आहेत. वातावरण तापवायचे आहे, त्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही इम्तियाज जलील यांनी केलाय.

तिसऱ्या आघाडीबाबत काय म्हणाले?

ते लोक आम्हाला जातीवादी म्हणतात पण मी दहा वर्ष संभाजीनगरचं लोकप्रतिनिधी होतो मी किंवा असदुद्दीन ओवेसी यांनी काय जातीयवादीपणा केलाय. कुठल्या धर्माबाबत बोलले आहेत, हे आम्हाला दाखवून द्यावं, पुरावा द्यावा तुमच्या तोंडीसुद्धा आता सत्ताधाऱ्यांचीच भाषा असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com