Weather Updates : मुंबई, ठाण्याला आज पाऊस झोडपणार, राज्यात कुठे काय स्थिती?

Weather Forecast News in Marathi : मुंबई, ठाण्यासह राज्यात आज काही जिल्ह्यात पावसाच्या सरी पाहायला मिळतील. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे.
Weather Update: पुढील 3 तासांत मुसळधार पावसाची शक्यता,
Maharashtra Weather Update
Published On

IMD Weather Report Today Maharashtra : राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुढील दोन दिवस काही जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम सुरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसानंतर उन्हाची तीव्रता अधिक प्रमाणात जावणत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. विशेषकरुन मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. रात्री पाऊस आणि दिवसा घामाच्या धारामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. (Maharashtra Weather Update)

मुंबईत आज पावसाची शक्यता -

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याशिवाय पालघर जिल्ह्यात हलक्या पावसाचा तर ठाणे जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात कुठे काय परिस्थिती ?

राज्यात आज अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २६ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर यादरम्यान राज्यात काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण अशेल. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरुपात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

गुरुवारपासून जोर ओसरणार -

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवापासून राज्यातील पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात बुधवारी दाना चक्रीवादळ तयार होणार आहे. गुरुवार हे चक्रीवादळ पुढे सरकेल. शुक्रवारी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळ गेलेले असेल. हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येणार नाही, असे हवामन विभागाने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com