Rain Alert : पाऊस झोडपणार! १५ राज्यांना सतर्कतेचा इशारा, महाराष्ट्रात कसा असेल पाऊस? जाणून घ्या अंदाज

Maharashtra Weather Update Today News : IMD ने दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह १५ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात मात्र पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज असून गडचिरोलीला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Heavy Rain In India weather update News
Heavy Rain In India weather update News AI Image
Published On
Summary
  • दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह १५ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

  • महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

  • गडचिरोलीला वादळी पावसासाठी येलो अलर्ट

  • महाराष्ट्रातील इतर भागांत ढगाळ वातावरण

देशातील हवामानावर एल निनोचा प्रभाव असल्याने वातावरणात सतत बदल पाहायला मिळत आहे. IMD च्या अंदाजानुसार आज दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह १५ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने काही भागांसाठी जोरदार वारे आणि वादळाचा इशाराही दिला आहे. या काळात वाऱ्यांचा वेग ताशी ७० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रात पावसाची उघडीप पाहायला मिळणार आहे.

'या' १५ राज्यांना अलर्ट

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्ली, उत्तराखंड,पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब,पश्चिम मध्य प्रदेश,छत्तीसगढ, अंदमान निकोबार, ओडिशा या १५ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Heavy Rain In India weather update News
Kidney Stone : तुम्हाला किडनी स्टोन झालाय? ३० दिवस आधी दिसतील 'ही' लक्षणे, दुर्लक्ष कराल तर....

पुढील ४८ तासांत कसा असेल पाऊस?

उत्तर आणि पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पुढील ४८ तासांत उत्तर ओडिशा आणि झारखंडमार्गे पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालयीन भागातही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Heavy Rain In India weather update News
Political News : माजी उपमुख्यमंत्र्यांची उपराज्यपाल म्हणून नियुक्ती, भाजपच्या खासदाराला केंद्राकडून जबाबदारी

महाराष्ट्रात पावसाचा अंदाज काय?

महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने आज राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे आणि नाशिक, तसेच मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात मात्र विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील इतर भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, ऊन-सावल्यांच्या खेळात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळू शकतात. नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com