IMD Monsoon Update : पुढील ४८ तास धोक्याचे, आणखी एक मोठं संकट; आयएमडीचा हाय अलर्ट

Latest Monsoon Update : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
IMD Monsoon Update
IMD Monsoon UpdateSaam Tv News
Published On

मुंबई : यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला आहे, मान्सूनने व्यापलेल्या भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. केरळ, महाराष्ट्र आणि गोव्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सामान्य लोकांचं जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत, यामध्ये मोठं नुकसान झाले आहे. यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा अधिक होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.

दुसरीकडे एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार पुढील ३६ ते ४८ तासांमध्ये हा कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होणार असून त्यानंतर तो हळहळू उत्तरेकडे सरकणार आहे, याचा परिणाम म्हणजे जोरदार वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

IMD Monsoon Update
मोठी बातमी ! आषाढी एकादशीला 'या' वाहनांना टोलमाफी, एकनाथ शिंदेंची घोषणा

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दोन जूनपर्यंत केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग हा ताशी ४०-५० किलोमीटर प्रती तास इतका राहण्याचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू उत्तरेकडे सरकणार आहे. पुढील ४८ तासांमध्ये त्याची दिशा अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र याचा परिणाम म्हणून केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. गोव्याला देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

IMD Monsoon Update
PM Kisan Samman Nidhi: विनाअडथळा पीएम किसानचे 2000 रुपये हवे तर 'ही' तीन कामे लगेच करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com