१३ राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे
महाराष्ट्रात तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला
अकोल्यात सर्वाधिक ४०.१°C तापमानाची नोंद
मुंबई, पुणे, ठाण्यात उकाडा वाढण्याचा इशारा
पुढील २-३ दिवसांत तापमान आणखी वाढणार
हवामान विभागानं आज १३ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरसह ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या काळात ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर आणि पूर्व भारतात विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आल आहे.
राज्यातून अवकाळी पावसाने एक्झिट घेऊन तपमानाचा पारा ४० अंशावर गेला आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हाचा उकाडा वाढला असून नागरिक हैराण झाले आहेत. आज अनेक ठिकाणी हवामान अंशतः ढगाळ राहणार आहे, मात्र उन्हाचा उकाडा कायम राहणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे या शहरांमध्ये तापमानाचा पारा २ ते ३ अंशांनी वाढणार असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
काल अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गडचिरोली आणि सोलापूर येथे तापमान ४० अंशावर गेले आहे. तर अमरावती, वर्धा, परभणी येथे ३९ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. धुळे येथे राज्यातील नीचांकी १५ अंश सेल्सिअस तापमान काल नोंदले गेले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकणात हवामान कोरडे राहणार असून मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरीत,पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये उकाडा वाढणार आहे. मराठवाड्यात देखील अंगाची लाहीलाही होण्याइतपत उन्हाचा कडाका असणार आहे. तसेच येत्या २ ते ३ दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान ४० अंश सेल्सियस पार जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अकोल्यात ४०.१ अंश तापमानाची नोंद झाली आहे. दिवसभर उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने अकोलेकरांची लाही लाही होत आहे. आगामी काही दिवस अकोल्यात उष्णतेची लाट कायम राहणार, असा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. अशातच अकोल्यातील फळबाग शेतकरी आपल्या फळबागांची विशेष काळजी घेत आहेत, ज्यात प्रामुख्याने हिरव्या जाळीच्या नेटचा वापर करून शेती झाकली जात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.