Election Code of conduct
Election Code of conduct

Assembly Election : राज्यात आचारसंहित! नगरमध्ये २ कोटींची विदेशी दारु जप्त, राज्यात १४ कोटी ९० लाख रुपयांची मालमत्ता जप्त!

Election Code of conduct : राज्यात सध्या आचारसंहिता सुरु आहे. कठोर कारवाई करण्याकरिता पथके नेमण्यात आली आहेत.
Published on

Maharashtra Assembly Election : राज्यात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांची करडी नजर आहे. नगरमध्ये पोलिसांनी तब्बल दोन कोटी रुपयांची दारु जप्त केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी दोन कोटी रूपयांची दारू पकडली आहे. त्यामुळे राज्यात चर्चा सुरु झाल्या आहेत.

२ कोटींची दारु जप्त

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी २ कोटी २ लाख रुपयांची विदेशी दारू जप्त केली आहे. गोवा राज्यातील मडगाव येथून इंदौर, मध्य प्रदेशला विदेशी दारू घेऊन जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे बायपास रोडवरील अरणगाव शिवारात सापळा लावून हा ट्रक ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी दीपक पाटील, शहाजी पवार, शैलेश जाधव या तीन जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या आरोपींची कसून चौकशी करून या विदेशी दारूचे मध्यप्रदेश कनेक्शनच्या मुळाशी जाणार असल्याचं पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले.

Election Code of conduct
Code of Conduct Rules : आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्या गोष्टींवर लागतात निर्बंध?

पोलिसांची करडी नजर

राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल घोषित होईपर्यंतच्या कालावधीत आचारसंहिता लागू असेल. या कालावधीत राज्यात अवैध दारुची निर्मिती, वाहतूक तसेच विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क, आणि पोलिसांची करडी नजर आहे. कठोर कारवाई करण्याकरिता पथके नेमण्यात आली आहेत. परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक रोखणे, रात्रीची गस्त, संशयित वाहनांची तपासणी तसेच अवैध दारु धंद्याना प्रतिबंध करण्याच्या सूचना सर्व पथकांना देण्यात आल्या. त्यानुसार पथकांकडून अवैध मद्यावर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.

१४ कोटी ९० लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त

राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ५७६ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी५६३ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९८ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या असल्याची माहिती, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली. राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण १४ कोटी ९० लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

Election Code of conduct
Code Of Conduct : आचारसंहिता म्हणजे काय?

पुणे शहरातून ५ हजाराहून अधिक राजकीय बॅनर हटवले

विधानसभा निवडणुकीच्यासा आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. तब्बल तीन दिवसात ५ हजाराहून अधिक राजकीय बॅनर पुणे महानगर पालिकेकडून हटवण्यात आले आहेत . महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने बुधवारी १हजार ७०७, गुरुवारी १ हजार ८६५,तर शुक्रवारी १ हजार ६७९ बॅनर काढले आहेत. पुढील कारवाईत पुणे शहरामध्ये लावण्यात आलेले अजून बॅनर, वॉल पेंटिंग्स काढून टाकण्यात येणार महापालिकेचे असल्याचे निर्देश आकाश चिन्ह विभागाने दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com